WPL 2024 Schedule : महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक आज जाहीर केले गेले. २०२३ मध्ये पहिले पर्व मुंबई व नवी मुंबई येथे खेळवण्यात आले होते आणि मुंबई इंडियन्सने जेतेपदाचा पहिला मान पटकावला होता. पण, यंदाच्या पर्वात एकही सामना मुंबई अथवा नवी मुंबईत होणार नाही. २३ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत ही स्पर्धा बंगळुरू व नवी दिल्ली येथे खेळवली जाणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात २३ फेब्रुवारीला उद्घाटनीय सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल.
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांव्यतिरिक्त गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे संघ लीगमध्ये सहभागी होणार आहेत. लीगच्या सर्व लढती सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होतील.
WPL 2024 Time Table२३ फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू२४ फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. यूपी वॉरियर्स, बंगळुरू२५ फेब्रुवारी - गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू२६ फेब्रुवारी - यूपी वॉरियर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू२७ फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. गुजरात जायंट्स, बंगळुरू२८ फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स वि. यूपी वॉरियर्स, बंगळुरू२९ फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू१ मार्च - यूपी वॉरियर्स वि. गुजरात जायंट्स, बंगळुरू२ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू३ मार्च - गुजरात जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू४ मार्च - यूपी वॉरियर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, बंगळुरू५ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली६ मार्च - गुजरात जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली७ मार्च - यूपी वॉरियर्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली८ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. यूपी वॉरियर्स, दिल्ली९ मार्च - मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स, दिल्ली१० मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली११ मार्च - गुजरात जायंट्स वि. यूपी वॉरियर्स, दिल्ली१२ मार्च - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली१३ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स, दिल्ली१५ मार्च - एलिमिनेटर, दिल्ली१७ मार्च - फायनल