Join us  

T20 World Cup, IND vs ENG Semi Final : काल रोहित, आज विराट कोहली! हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर स्टार फलंदाज जखमी, जाणून घ्या अपडेट्स

T20 World Cup, India vs England Semi Final : उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी भारतीय संघासमोर संकट येताना दिसत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 10:57 AM

Open in App

T20 World Cup, India vs England Semi Final : उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी भारतीय संघासमोर संकट येताना दिसत आहेत. एडिलेट येथे इंग्लंडविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय संघाच्या दोन स्टार फलंदाजांना नेट्समध्ये दुखापत झाली आहे. मंगळवारी कर्णधार रोहित शर्माच्या हातावर वेगाने चेंडू आदळला आणि आज विराट कोहली ( Virat Kohli) जखमी झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा १५ वर्षांचा दुष्काळ संपवणार अशी अपेक्षा आहे. भारतीय संघासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचे आव्हान आहे आणि हा संघ डेंजर असल्याचे मत रोहितने आधीच व्यक्त केले होते. पण, इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघाची धाकधुक वाढवणाऱ्या घटना घडत आहेत. 

India vs Pakistan यांच्यात फायनल होऊ देणार नाही; उपांत्य फेरीच्या आधी भारताला चॅलेंज!

 

काल रोहित शर्मा, हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक नेट्समध्ये सराव करत होते. पण, थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूने टाकेलल्या चेंडूवर रोहितला दुखापत झाली. रघूने टाकलेला शॉर्ट पिच चेंडू रोहितच्या हातावर जाऊन आदळला. याआधीचा चेंडू रघूने यॉर्कर फेकला होता आणि त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू फेकला. १२०kph च्या वेगाने आलेला चेंडूवर रोहितला दुखापत झाली. विक्रम राठोड व गोलंदाजी प्रशिक्षक पासर म्हाम्ब्रे रोहितच्या दिशेने पळत आले. फिजिओ कमलेश जैन व टीम डॉक्टरही तेथे दाखल झाले. त्यांनी रोहितच्या हातावर आईस पॅक लावला आणि ४० मिनिटे तो एका कोपऱ्यात बसून राहिला. पण, त्यानंतर त्याने पुन्हा सराव केला.

द्रविड, कोहली, रोहितने गोलंदाजांसाठी विमानातील बिझनेस सीटचा त्याग केला; कारण वाचून 'झक्कास' म्हणाल

काल माझ्या हातावर चेंडू आदळला, परंतु आता मी बरा आहे. मनगटावर थोडसं खरचटलं आहे, परंतु मी उपांत्य फेरीच्या लढतीत खेळणार असल्याचे, रोहितने आज स्पष्ट केले. पण, त्याचवेळी नेट्समध्ये सराव करताना विराट कोहलीला दुखापत झाली. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर विराट नेट्समध्ये सराव करत होता आणि एक चेंडू विराटला लागला. त्यानंतर विराटने त्वरित सराव थांबवला. तो काही काळ नेट बाहेर गेला. मात्र, सुदैवाने विराटची दुखापत गंभीर नसल्याचे अपडेट्स समोर येत आहेत. 

भारताची कामगिरी

  • ४ विकेट्स राखून वि. विरुद्ध पाकिस्तान
  • ५६ धावांनी वि. विरुद्ध नेदरलँड्स
  • ५ विकेट्सने पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • ५ धावांनी ( DLS) वि. विरुद्ध बांगलादेश
  • ७१ धावांनी वि. विरुद्ध झिम्बाब्वे

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App