Join us  

IND vs SA 3rd T20I : विराट कोहलीसह टीम इंडियाने स्टार फलंदाजाला दिली विश्रांती, तिसऱ्या सामन्यात दिसणार नाही हिट जोडी

IND vs SA 3rd T20I : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका गुवाहाटी येथेच खिशात घातली. दुसऱ्या ट्वेंटी-२०त १६ धावांनी विजय मिळवून भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 4:29 PM

Open in App

IND vs SA 3rd T20I : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका गुवाहाटी येथेच खिशात घातली. दुसऱ्या ट्वेंटी-२०त १६ धावांनी विजय मिळवून भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. विराट कोहली ( Virat Kohli) गुवाहाटी येथून थेट मुंबईत दाखल झाला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्याने तीन दिवसांची सुट्टी घेतलीय आणि तो कुटुंबियांसोबत राहणार आहे. विराटसह BCCI ने आणखी एका फॉर्मात असलेल्या फलंदाजाला विश्रांती दिल्याचे वृत्त समोर येतेय.. त्यामुळे इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात सुपर हिट जोडी दिसणार नाही.

ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या यांची कामगिरी चांगली झालेली पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मालिका जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. आघाडीची फळी चांगली कामगिरी करत आहे, तर दिनेश कार्तिक दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतोय. रिषभ पंतला अद्याप संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला संधी मिळावी यासाठी सूर्या, विराट किंवा लोकेश यांना विश्रांती दिली जाऊ शकते.

''विराट कोहली सलग क्रिकेट खेळतोय आणि त्याला त्याच्या वर्कलोड बाबत काळजी घ्यायला हवी. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर आहे आणि त्यात विराट मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असायला हवा. त्यामुळे त्याला काही दिवसांची विश्रांती दिली गेली आहे,''असे एका सूत्रांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले.

विराटसह सलामीवीर लोकेश राहुल ( KL Rahul) यालाही विश्रांती दिल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकेशने आफ्रिकेविरुद्ध  दोन सामन्यांत ५१* व ५७ धावांची खेळी करून विजयात मोठा वाटा उचलला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्मालोकेश राहुल
Open in App