India vs Sri Lanka Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) मंगळवारी श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. श्रीलंकेचा संघ तीन ट्वेंटी-२० आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) १०० वा कसोटी सामना कुठे खेळतो याची उत्सुकता सर्वांना होती आणि बीसीसीआयनं सुधारित वेळापत्रक जाहीर करताच अनेकांची घोर निराशा झाली. BCCI announces revised schedule for home series against Sri Lanka
वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधाराची अद्याप घोषणा झालेली नाही, परंतु रोहितच नेतृत्व सांभाळेल ही शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराटला १०० वा कसोटी सामना खेळण्याची संधी होती, परंतु त्याने कंबरेत उसण भरल्यामुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली. त्यामुळे आता त्याची १०० वी कसोटी भारतातच होणार आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार लखनौमध्ये पहिली ट्वेंटी-२० लढत होईल आणि त्यानंतर दोन्ही स सामने धर्मशाला इथे होतील. India vs Sri Lanka यांच्यातला पहिला कसोटी सामना ४ ते ८ मार्च या कालावधीत मोहाली येथे होईल आणि तो विराटचा १०० वा कसोटी सामना असेल. त्यानंतर १२ ते १६ मार्च या कालावधीत दुसरी कसोटी होईल आणि डे नाईट असेल. RCBचा कर्णधार असलेल्या विराटला बंगळुरू येथील मैदानावार १०० वा कसोटी सामना खेळण्यास मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
सुधारित वेळापत्रकपहिली ट्वेंटी-२० - २४ फेब्रुवारी, लखनौदुसरी ट्वेंटी-२० - २६ फेब्रुवारी, धर्मशालातिसरी ट्वेंटी-२० - २७ फेब्रुवारी, धर्मशालापहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहालीदुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट), बंगळुरू