Join us  

मोठी बातमी: सौरव गांगुलीची लोकप्रियता खुपतेय, म्हणून...! Mamata Banerjee यांची पंतप्रधान मोदींना विनंती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्या वाट्याला वाईट अनुभव आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 3:21 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्या वाट्याला वाईट अनुभव आला. २०१९मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुलीसमोर कोरोनाचं मोठं संकट उभं राहिलं. त्यातही त्याने BCCI च्या टीमला सोबत घेऊन इंडियन प्रीमिअर लीगचे आयोजन युएई व भारतात करून दाखवला. तरीही त्याला अध्यक्षपदावर पुढे कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. गांगुलीला अशी वागणून दिल्याने तृणमुल काँग्रेसने भाजपावर राजकिय आरोप केले. दादाने BJP प्रवेशास नकार दिल्याने त्याला ही वागणूक दिल्याचा आरोप तृणमुल काँग्रेसकडून केला गेला. त्यात आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banarjee) यांनी या वादात उडी घेतलीय...

१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष असणार आहेत. आता गांगुली पुढे काय करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि एक बातमी समोर आली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या ( CAB) अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मैदानावर उतरणार आहे. येत्या २२ ऑक्टोबरला तो अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहे. गांगुलीने २०१५ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत CAB चे अध्यक्षपद भूषविले होते. 

बीसीसीआयची नवी टीम 

  • अध्यक्ष - रॉजर बिन्नी ( कर्नाटक)
  • सचिव - जय शाह ( गुजरात) 
  • उपाध्यक्ष - राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश)
  • खजिनदार - आशिष शेलार ( महाराष्ट्र)  
  • सर चिटणीस - देवाजित सैकिया ( आसाम)
  • आयपीएल चेअरमन - अरुण धुमाळ ( हिमाचल प्रदेश)

 

ममता बॅनर्जी यांची विनंती...

''मी पंतप्रधानांना विनंती करतो की सौरव गांगुलीला ICCची निवडणूक लढवण्याची परवानगी दिली पाहिजे. तो एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे, म्हणूनच त्याला वंचित ठेवले जात आहे. सरकारने राजकीय निर्णय घेऊ नये, क्रिकेट, खेळासाठी निर्णय घ्यावा अशी विनंती.  तो राजकीय पक्षाचा सदस्य नाही,''असे बॅनर्जी म्हणाल्या.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सौरभ गांगुलीममता बॅनर्जीनरेंद्र मोदीआयसीसीबीसीसीआय
Open in App