महेंद्रसिंग धोनीला आज जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर Happy Birthday Dhoni ट्रेंड होत आहे. पण, अशात धोनीचा जवळचा मित्र आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी सहकाऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू ब्रेंडन मॅकलम याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मॅकलमनं इंस्टाग्रामवरून हॉस्पिटलमधला फोटो पोस्ट करून ही माहिती दिली.
मॅकलमनं एका रग्बी सामन्यात सहभाग घेतला होता आणि त्यावेळी त्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी त्यानं युनायटेड माटामाटासाठी रग्बी सामना खेळला आणि त्यात त्याचा संघ 32-30 अशा फरकानं जिंकला.
ब्रँडन मॅकलननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून निवृत्ती घेतली आहे आणि आयपीएल 2020मध्ये त्याला कोलकाता नाइट रायडर्सनं मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले.
मॅकलमनं 101 कसोटी, 260 वन डे आणि 71 ट्वेंटी-20 सामन्यांत न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानं कसोटीत 6453 धावा, वन डेत 6083 आणि ट्वेंटी-20त 2140 धावा केल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीला पत्नी साक्षीकडून रोमँटिक शुभेच्छा; सांगितला बर्थ डे प्लान
माही, तो 'टफ कॉल' घ्यायची हीच ती वेळ, कारण...
काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे Unseen Photo व्हायरल!
महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!
समुद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की कायम तुझी आठवण येते; केदार जाधवंच भावनिक पत्र
महेंद्रसिंग धोनीला DJ Bravoचं अनोखं गिफ्ट; पाहा भन्नाट गाणं
मुंबई पोलिसांच्या MS Dhoniला काव्यात्मक शुभेच्छा; नावात शोधलं सोशल डिस्टन्सिंग!
Do You Know : महेंद्रसिंग धोनीचे जाहिरात अन् क्रिकेट व्यतिरिक्त 'हे' सात इन्कम सोर्स!