कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक अशी घटना घडली की सर्व चाहत्यांचं लक्ष इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकानं वेधून घेतलं. पाकिस्तानचा दुसरा डाव सुरू असताना इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्क्युलम कराची स्टेडियमच्या १३ फूट उंच लोखंडी जाळीवर चढला. मॅक्क्युलमचा हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. पण मॅक्क्युलमनं असं का केलं यामागचं कारणही कळालं आहे.
एका चाहत्याचं टी-शर्ट लोखंडी जाळीवर अडकलं होतं ते काढून देण्यासाठी ब्रँडन मॅक्क्युलम स्वत: जाळीवर चढला. बाऊंड्री लाइनवर उभारण्यात आलेल्या सुरक्षा जाळीवर एका चाहत्याचं टी-शर्ट अडकलं होतं. जे काढण्यासाठी एका मोठ्या काठीचा वापर केला जात होता. मॅक्क्युलम हे सारं पाहात होता. टी-शर्ट काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचं पाहताच मॅक्क्युलम जागेवरुन उठला आणि स्वत: लोखंडी जाळीवर चढला. चाहतेही ते पाहात बसले आणि मॅक्क्युलमचं कौतुक केलं.
मॅक्क्युलमच्या फिटनेसला तोड नाही
ब्रँडन मॅक्क्युलमनं क्रिकेटला अलविदा केल्यानंतर इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. नुकतंच त्यानं इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला सिक्स हिटिंग स्पर्धेत हरवलं होतं. मॅक्क्युलम फक्त शाररीक नव्हे तर मानसिक पातळीवरची खूप सामर्थ्यशाली खेळाडू आहे. आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅक्क्युलमनं इंग्लंडच्या कसोटी संघातही आक्रमकपणा आणला आहे. मॅक्क्युलम इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कोच बनल्यामुळे संघ चांगलाच मजबूत बनला आहे.
Web Title: brendon mccullum stunt video viral karachi stadium england vs pakistan 3rd test en vs pak
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.