Join us  

मानलं भावा; ब्रेट ली यानं ऑक्सिजन खरेदीसाठी केली ४३ लाखांची मदत; म्हणाला, भारत हे माझं दुसरं घर!

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज साडेतीन लाखांच्या घरात जात आहे आणि अशात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 6:00 PM

Open in App

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज साडेतीन लाखांच्या घरात जात आहे आणि अशात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना प्राण गमवावे लागत आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ऑस्ट्रेलियनं क्रिकेटपटू पुढे येताना दिसत आहेत. पॅट कमिन्स याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली ( Brett Lee) यानं कोरोना संकटाशी दोन हात करणाऱ्या भारताला मदत केली आहे. त्यानं सोशल मीडियावरून ही माहिती दिली. भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!

तो म्हणाला,''भारत हे माझं दुसरं घरच आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतर येथील लोकांकडून मिळालेल्या प्रेमाचं माझ्या हृदयात वेगळं स्थान आहे. या संकटकाळात लोकांना मरताना पाहून मनाला वेदना होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी मला थोडासा हातभार लावण्याची संधी मिळतेय, हे मी माझं भाग्य समजतो. मी एक बिटकॉईन www.cyptorelief.in ला दान करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून भारतातील विविध हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.''IPL 2021 : पॅट कमिन्सनंतर KKRच्या आणखी एका खेळाडूचा पुढाकार; गौतम गंभीर फाऊंडेशनला केली मदत

''या संकटाशी सर्वांना एकत्र येऊन मुकाबला करण्याची वेळ आहे आणि आपल्याकडून जेवढी शक्य आहे तेवढी मदत करणेही गरजेचे आहे. वेळ काळ न पाहता दिवसरात्र या संकटाशी सामना करणाऱ्या प्रत्येक फ्रंटलाईन वर्करचे मी आभार मानतो. मी लोकांना विनंती करतो की घरीच राहा, सुरक्षित राहा आणि वारंवार हात धुवा. गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा अन् मास्क घाला. पॅट कमिन्सचेही कौतुक,''असे ब्रेट लीनं म्हटले आहे.  सर जी तुस्सी ग्रेट हो!; रवींद्र जडेजानं लॉकडाऊनमध्ये केली मोठी समाजसेवा, बहिणीनं जगासमोर आणलं त्याचं कार्य!

ब्रेट लीनं ७६ कसोटींत ३१० विकेट्स, २२१ वन डे सामन्यांत ३८० विकेट्स अन् २५ ट्वेंटी-२० सामन्यांत २८ विकेट्स घेतल्या आहेत.  

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाकोरोना वायरस बातम्या