ODI World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप २०२३ या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत भारतात आयोजित केला जाईल, परंतु त्याआधी आयसीसीच्या या मेगा स्पर्धेच्या विजेत्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. भारतात होणा-या या वर्ल्ड कप स्पर्धेला अजून सात महिने बाकी आहेत, पण या वर्षी २०२३ चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाच्या नावाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला आहे.
भारतात येऊन पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकणार! बाबरच्या नव्हे तर ३ खेळाडूंच्या जीवावर वसीम अक्रमचा दावा
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली ( Brett Lee) याने यावेळी 2023 च्या वर्ल्ड कप जेतेपदाची ट्रॉफी कोणता संघ उचलणार याची मोठी भविष्यवाणी केली आहे. ब्रेट लीने स्पोर्ट्स यारीशी केलेल्या संभाषणात या वर्षी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे नाव सांगितले आहे. ब्रेट ली म्हणाला, ''भारत २०२३ च्या वर्ल्ड कप विजयाचा प्रबळ दावेदार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताला पराभूत करणे कठीण होईल. भारताला भारतीय परिस्थितीबद्दल सर्वात जास्त आणि चांगले माहिती आहे, त्यामुळे मला वाटते की भारत २०२३ चा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.''
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही ७ जूनपासून होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या विजेत्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल (लंडन) मैदानावर खेळवला जाईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चे जेतेपद कोणता संघ जिंकेल याविषयी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली म्हणाला, ''ऑस्ट्रेलिया जिंकेल.' ब्रेट ली पुढे म्हणाला, ''भारत हा एक चांगला संघ आहे, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे आणि मला वाटते की तिथली परिस्थिती ऑस्ट्रेलियाला अधिक अनुकूल असेल, त्यामुळे ऑस्ट्रेलिया बाजी मारेल.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"