नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup 2022) सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघ दिसणार आहे. तर बुमराहच्या जागी राखीव खेळाडूंपैकी मोहम्मद शमीला स्थान मिळू शकते. भारतीय संघाची कमकुवत गोलंदाजी चिंतेचा विषय असतानाच क्रिकेटमधील दिग्गज यावर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने देखील याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
सर्वोत्तम कार गॅरेजमध्ये ठेवले - ब्रेट ली
ब्रेट लीने भारतीय गोलंदाजीवर पर्याय सुचवताना म्हटले, "उमरान मलिक ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करत आहे. म्हणजेच तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम कार आहे आणि तुम्ही ती गॅरेजमध्ये सोडून देत आहात, तेव्हा ती कार असून काय फायदा आहे? उमरान मलिकची भारतीय संघात विश्वचषकासाठी निवड व्हायला हवी होती." ब्रेटनीने खलीज टाईम्सला संवाद साधताना हे वक्तव्य केले.
"होय, तो युवा आहे, अनुभव खूप कमी आहे. पण तो 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे, म्हणून त्याला संघात घ्यायला हवे. त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जा, इथे चेंडूला चांगली गती मिळते. तुमच्याकडे एखादा माणूस 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत असेल तर ही मोठी गोष्ट आहे." एकूणच ब्रेट लीने उमरान मलिकचा भारतीय संघात समावेश करायला हवा असे म्हटले आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
13 नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Brett Lee said that India has the best car like Umran Malik but it in the garage
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.