जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी 39 लाख, 17,585 इतकी झाली असून 13 लाख, 44,136 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 2 लाख 70,720 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या संकटात क्रिकेट विश्वाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचे माजी फलंदाज ब्रायन बोलूस यांचे वृद्धापकाळानं वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले.
धक्कादायक: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू Corona Positive; यकृत अन् मूत्रपिंड झाले निकामी
बोलूस यांनी 1963 आणि 1964 या कालावधीत सात कसोटी सामन्यांत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात वेस्ट इंडिजचे दिग्गज वेस हॉल यांनी टाकलेला चेंडू बोलूस यांच्या चेहऱ्यावर आदळला होता. बोलूस यांच्या नावावर एक विश्वविक्रम आहे. कसोटी कारकिर्दीत त्यांनी 12 डावांत दुहेरी आकडा गाठण्याचा पराक्रम केला आहे. आजही हा विक्रम कायम आहे. भारताविरुद्धची मद्रास येथील 88 धावांची खेळी ही त्यांची सर्वोत्तम आहे.
शाहिद आफ्रिदीच्या All Time वर्ल्ड कप संघात Sachin Tendulkarला स्थान नाही
इंग्लंड क्रिकेट संघाच्या निवड समितीतही ते होते आणि नॉटिंगहॅमशायर क्लबचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. 7 कसोटी सामन्यांत त्यांच्या नावावर 496 धावा आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 469 सामन्यांत 25598 धावा केल्या आहेत. त्यात 39 शतकांचा समावेश असून नाबाद 202 ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्यांनी 143 सामन्यांत 3110 धावा केल्या होत्या.