Join us  

"T20 WC मध्ये रोहित-विराट यांनी ओपनिंगला यायला नको, त्याने नकारात्मक परिणाम होईल"

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर लगेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करणे, ही समितीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 7:40 PM

Open in App

T20 World Cup 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर लगेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करणे, ही समितीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. मे महिन्याच्या पहिल्याच्या आठवड्याच्या आता वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ जाहीर करायचा आहे. विराट कोहलीला संधी मिळणार नाही, अशी चर्चा रंगवली जात आहे. रोहित शर्माकडेच टीम इंडियाचे नेतृत्व असेल हे BCCI चे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. विराटसह काही सीनियर खेळाडूंचे संघातील स्थान अद्याप निश्चित नाही. त्यात वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा ( Brian Lara) यांनी रोहित शर्माविराट कोहली यांनी सलामीला येऊ नये, असे स्पष्ट मत मांडले आहे.  

रोहित व विराट कोहली यांचे सलामीचा स्ट्राईक रेट हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. रोहितला यंदाच्या आयपीएल पर्वात अद्याप अर्धशतक झळकावते आले नाही, परंतु त्याचा स्ट्राईक रेट १७१.०१ असा राहिला आहे. "मला वाटते की रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीवीर म्हणून वेस्ट इंडिजमध्ये  भारतासाठी चांगली कामगिरी करतील. जेव्हा तुम्ही तुमचा संघ आणि तुमच्या फलंदाजीची क्रमवारी निवडत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या खेळाडूंना काय हवे आहे, या आधारावर संघाची निवड करावी लागेल. ती जागा कोण भरते याने काही फरक पडत नाही. तुम्हाला पहिल्या ६ षटकात ७०-८० धावा करायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला खेळाडू निवडावे लागतील. मग कोणाच्या नावाने काही फरक पडत नाही,” लाराने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले.

लाराला वाटते की कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे आणि अँकरची भूमिका बजावली पाहिजे, तर एका युवा फलंदाजाने पॉवर प्ले ओव्हर्समध्ये अधिक मुक्तपणे खेळले पाहिजे. " रोहित व विराट हे महान खेळाडू आहेत. तुमच्याकडे सुरुवातीच्या क्रमांकावर काही युवा खेळाडू असले पाहिजेत. तरुण खेळाडूंपैकी एक, त्यांची क्षमता दाखवू शकतात आणि अनुभवी खेळाडूंपैकी एकाने मधल्या फळीतील डावाला शेवटपर्यंत सांभाळायला हवे. हे दोन्ही अनुभवी खेळाडू सलामीला येताच लवकर बाद झाले तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो,''असे लारा म्हणाला. 

११ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रोहित आणि कोहली एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात सामना होणार आहे आणि या दोन्ही संघांना  आतापर्यंत संघर्ष करावा लागला आहे व त्यांनी प्रत्येकी एक विजय नोंदवला आहे. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माविराट कोहली