ठळक मुद्देभारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे
श्रीलंका क्रिकेट बोर्ड सध्या अडचणीत सापडलं आहे. त्यांच्या अवतीभवती अनेक वादग्रस्त घटना घडताना दिसत आहेत. भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि १३ जुलैपासून मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पण, तत्पूर्वी लंकन बोर्डानवर एकामागून एक संकट आलेली पाहायला मिळत आहेत. लंकन बोर्डाच्या माजी सदस्यावर लाच देण्याच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आली, प्रमुख खेळाडूंनी कोरोना चे नियम मोडले अन् त्यांच्यावरही बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
श्रीलंका क्रिकेटचे माजी Performance Analyst सनथ जयसुंदरा (Sanath Jayasundara) याच्यावर क्रीडा मंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सनथने 2019 साली श्रीलंका ए दौऱ्यात निवड प्रभावित करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता, याप्रकरणी सनथ दोषी आढळला. ''सनथला आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीने दोषी ठरवलं आहे. त्याच्यावर सात वर्षांची बंदी घातली गेली आहे. त्याला 11 मे 2019 पासून निलंबित करण्यात आलं होतं,''असे आयसीसीनं स्पष्ट केलं.
दुसरा धक्का म्हणजे श्रीलंकेच्या ट्वेंटी-२० संघाली खेळाडू भानुका राजपक्ष याला स्थानिक मीडियाला मुलाखत देणं महागात पडलं. त्यानं श्रीलंका क्रिकेट बोर्डावर टीका केली आणि त्यासाठी त्याला ५ हजार डॉलरचा दंड व बंदीला सामोरे जावे लागले.
हे इथवरच थांबलेलं नाही, तर संघातील तीन प्रमुख खेळाडू कुशल मेंडीस, निरोशान डिकवेला आणि धनुष्का गुणथिलका यांच्यावर एका वर्षांच्या बंदीची कारवाई झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर या तिघांनी कोरोनापासून वाचण्यासाठी तयार केलेला बायो बबल नियम मोडले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् लंकन क्रिकेट बोर्डानं त्यांना मायदेशात बोलावले अन् एका वर्षांची बंदी घातली.
Web Title: ‘Bribe, Corruption & More’, How Sri Lanka Cricket Suffered Shame Even Before Playing India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.