Video : पाकिस्तानी फलंदाज धावला 'मांजरी'च्या मागे; सहकारी म्हणाला, अज्जू भाई ती बायो बबलमध्ये नाहीय!

रावळपिंडी कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यानं  पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अली याला ट्रोल केलं

By स्वदेश घाणेकर | Published: February 8, 2021 10:18 AM2021-02-08T10:18:03+5:302021-02-08T10:18:23+5:30

whatsapp join usJoin us
Bubble me nahi hai yeh: Mohammad Rizwan hilariously trolls Azhar Ali as he chases a cat on field, Video | Video : पाकिस्तानी फलंदाज धावला 'मांजरी'च्या मागे; सहकारी म्हणाला, अज्जू भाई ती बायो बबलमध्ये नाहीय!

Video : पाकिस्तानी फलंदाज धावला 'मांजरी'च्या मागे; सहकारी म्हणाला, अज्जू भाई ती बायो बबलमध्ये नाहीय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटच्या नियमांत बरेच बदल झाले आहेत आणि आता हळुहळू खेळाडूंनाही या नियमांची सवय झाली आहे, त्यात बायो बबलचीही त्यांना सवय झाली आहे. पण, क्रिकेटच्या मैदानावरील त्यांची धम्माल मस्ती कमी झालेली नाही. पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( Pakistan vs South Africa 2nd Test) यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत विचित्र प्रकार पाहायला मिळाला आणि त्यावरून पाकिस्तान खेळाडूनं आपल्याच सहकाऱ्याला ट्रोल केलं. ICC Poll : विराट कोहलीला धक्का; पाकिस्तानचा बाबर आझम ठरला 'Cover Drive King'!

रावळपिंडी कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यानं  पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अली याला ट्रोल केलं. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असताना मैदानावर अचानक मांजर आली आणि अझर अली तिच्या मागे धावू लागला. तेव्हा रिझवान म्हणाला, 'अज्जू भाई टेस्ट नही किया, बबलमध्ये ती नाही आहे.' त्याचे हे बोलणे यष्टींमधल्या कॅमेरात रिकॉर्ड झाले.   उत्तराखंडमधील दुर्घटनेमुळे रिषभ पंत व्यथित; पीडितांना मदत जाहीर करत इतरांनाही केलं आवाहन

पाहा व्हिडीओ...


पाकिस्ताननं पहिल्या डावात २७१ धावा केल्या, परंतु त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २०१ धावांत गुंडाळून ७१ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर रिझवाननं दुसऱ्या डावात शतकी खेळी केली, परंतु पाकिस्तानचा संघ २९८ धावांत तंबूत परतला. आफ्रिकेसमोर विजयासाठी ३६९ धावांचे आव्हान आहे. पाकिस्ताननं या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकण्यासाठी त्यांना अखेरच्या दिवशी ९ विकेट्स घ्यायच्या आहेत, तर आफ्रिकेला बरोबरीसाठी   २४३ धावा करायच्या आहेत. 

 

Web Title: Bubble me nahi hai yeh: Mohammad Rizwan hilariously trolls Azhar Ali as he chases a cat on field, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.