Join us  

T20 World Cup : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमनं Live Matchमध्ये काढली सहकाऱ्याची इभ्रत; सोशल मीडियावर Video Viral

T20 World Cup : बाबर आजमच्या ( Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानं पहिल्या सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजवर ७ विकेट्स राखून दणदणती विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 8:29 PM

Open in App

T20 World Cup : बाबर आजमच्या ( Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानं पहिल्या सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजवर ७ विकेट्स राखून दणदणती विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेले १३१ धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं २७ चेंडू हातचे राखून पार केले. पण, या सामन्यात एक असा किस्सा घडला की त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. बाबर आजमनं सहकारी शाबाद खान याची सर्वांसमोर इभ्रत काढली. वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करताना हा प्रसंग घडला. 

शाहिन आफ्रिदीनं टाकलेल्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूची लेंडल सिमन्स याच्या बॅटला कड लागली आणि तो एक धाव घेण्यासाठी धावला. शाबाद खाननं डायरेक्ट हिट मारून बेल्स  उडवल्या परंतु आंद्रे फ्लेचरनं धाव पूर्ण केली होती. तेव्हा बाबरनं शाबादची फिरकी घेतली. तो म्हणाला, म्हातारा झालास तू, तरुण असता तर ही विकेट मिळाली असती.  “Budday ho gaye ho x2 Jawani vich tera run out se.”  

पाहा व्हिडीओ..

पाकिस्ताननं पहिल्याच सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं ठेवलेलं १३१ धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं १५.३ षटकांत पूर्ण केलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) ४१ चेंडूंत ५० धाला तर फाखर झमानने २४ चेंडूंत ४६ धावा कुटल्या. विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजला धक्के दिले. विंडीजला २० षटकांत ७ बाद १३० धावा करता आल्या. किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकात सलग पाच चौकार खेचून विंडीजची धावसंख्या वाढवली. शिमरोन हेटमायरने २८ धावा केल्या, तर पोलार्डनं १० चेंडूंत २३ धावा कुटल्या. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानबाबर आजम
Open in App