नवी दिल्ली : द.आफ्रिकेत पहिल्या कसोटीत संघ व्यवस्थापन जसप्रीत बुमराह याला संधी देऊ शकते. पदार्पणास उत्सुक असलेला बुमराह गोलंदाजीतील आगळीवगेळी शैली व यॉर्करमुळे केपटाऊनच्या खेळपट्टीवर भेदक ठरू शकेल, असा विश्वास माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने व्यक्त केला.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नेहरा म्हणाला,‘जसप्रीत बुमराह केपटाऊन कसोटीत उत्तम पर्याय ठरू शकेल. संघ व्यवस्थापनाचा काय विचार आहे, मला माहीत नाही; पण बुमराहसारखा गोलंदाज न्यूलॅन्ड्सच्या खेळपट्टीवर चमक दाखवू शकतो. त्याला आम्ही पांढºया चेंडूने खेळताना पाहिले असेल; पण त्याआधी वर्षभर गुजरातसाठी त्याने मोठी कामगिरी केली, हे विसरून चालणार नाही. पाचही वेगवान गोलंदाजांत तो सर्वात वेगवान यॉर्कर टाकतो. त्याची शैली इतकी शानदार आहे की चेंडू कसा येईल, हे सहज समजू शकत नाही. याशिवाय केपटाऊनमध्ये हवामानाची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.’जानेवारीत केपटाऊनमध्ये उकाडा असतो. अशा वेळी वेगवान गोलंदाजांना त्रास होतो. खेळपट्टी पाटा असल्यास भुवनेश्वरला स्विंग आणि सीम मिळणार नाही. बुमराहचा रेकॉर्ड पाहता त्याच्यात दीर्घकाळ मारा करण्याची क्षमता जाणवत असल्याचे नेहराचे मत आहे.प्रथमश्रेणी सामन्यात लाल चेंडूने मारा करणारा बुमराह संधी मिळाल्यास लाल कुकाबुरा चेंडूने पहिल्यांदाच मारा करणार आहे. पण काही अडचण जाणार नसल्याचे नेहराला वाटते. याविषयी तो म्हणाला, ‘बुमराहने गेली दोन वर्षे पांढºया कुकाबुरा चेंडूने गोलंदाजी केली. लाल आणि चेंडूचे सीम एकसारखेच असते.’ बुमराहला प्राधान्य दिल्यास तो मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांची सोबत करेल. शमी हा स्ट्रायकर गोलंदाज असल्याने त्याचा वापर अधूनमधूनच व्हायला हवा.’ (वृत्तसंस्था)>भारतासाठी तिसरा गोलंदाज निवडणे कठीण असल्याची कबुली नेहराने दिली. तो म्हणाला,‘बुमराह, भुवी आणि उमेश यादव यापैकी एकाची निवड करणे कठीण जाईल. उमेश उत्कृष्ट आऊटस्विंगर टाकतो. माझ्या मते, उमेश खेळण्यास दावेदार आहे. पण परिस्थिती ओळखून निवड कशी होते, यावर सर्वकाही अवलंबून असेल.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पहिल्या कसोटीसाठी बुमराह उत्तम पर्याय- आशिष नेहरा
पहिल्या कसोटीसाठी बुमराह उत्तम पर्याय- आशिष नेहरा
नवी दिल्ली : द.आफ्रिकेत पहिल्या कसोटीत संघ व्यवस्थापन जसप्रीत बुमराह याला संधी देऊ शकते.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:27 AM