मेलबर्न : ‘वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज कर्टली एम्ब्रोस यांच्या मते भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा अन्य गोलंदाजांपेक्षा खूपच वेगळा आहे. आणि तो जर तंदुरुस्त राहिला तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी घेऊ शकतो.’ वेस्ट इंडिकडून ९८ कसोटी सामन्यात २०.९९च्या सरासरीने ४०५ बळी घेणाऱ्या एम्ब्रोस याने सांगितले की, सध्या भारतीय गोलंदाजांमध्ये त्यांना बुमराहने प्रभावित केले आहे. (Bumrah can get 400 wickets in Tests says Ambrose)
एम्ब्रोस यांनी त्यांच्या कर्टली आणि करिश्मा शोमध्ये म्हटले की, ‘भारताकडे काही खूप चांगले गोलंदाज आहेत. मी बुमराहचा मोठा प्रशंसक आहे. मी त्याची गोलंदाजी पाहिली आहे. तो सर्वांपेक्षा खूपच वेगळा आहे. तो इतका प्रभावी आहे आणि मला त्याच्याकडून आशा आहे. तो खूप चांगला खेळ करेल.’ तो ४०० बळी घेऊ शकतो का, यावर एम्ब्रोस यांनी म्हटले की, ‘जर तो फिट राहिला आणि योग्य वेळेपर्यंत खेळला तर तो असे करू शकतो. तो सीम आणि स्विंग करू शकतो आणि यॉर्करही उत्तम टाकतो. त्याच्याकडे क्षमता आहे. तो बराच काळ खेळला तर मला आशा आहे की तो हे यश नक्कीच मिळवू शकतो.’ २०१८मध्ये कसोटीत पदार्पण करणाऱ्या बुमराहने फक्त १९ कसोटीत २२.१०च्या सरासरीने ८३ बळी घेतले आहेत. भारतीय संघाचा तो महत्त्वाचा भाग आहे.’
कर्टनी वॉल्श यांच्यासोबत कसोटी इतिहासातील सर्वात खतरनाक जोडींपैकी एक असणाऱ्या एम्ब्रोस यांच्या मते भारतीय गोलंदाज त्यांच्या छोट्या रन अपमुळे आपल्या शरीरावर अधिक दबाव टाकतात.’ त्यांनी सांगितले की, जलदगती ही लयीसोबत जोडली गेलेली असते. त्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला चांगली लय गरजेची असते.’
भारताला १८ जूनला साऊथम्पटनमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात आपला पहिला विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील सामना खेळणार आहे. आणि ॲम्ब्रोसच्या मते चांगले सलामीची जोडी ही विराटसाठी महत्त्वाची ठरेल. हे महत्त्वाचे आहे. कारण लवकर एक-दोन बळी गेले तर कर्णधार कोहली लवकरच गोलंदाजांच्या निशाण्यावर येतो. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजही अडचणीत येतात.’
Web Title: Bumrah can get 400 wickets in Tests says Ambrose
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.