दुबई : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला ऑगस्ट महिन्याचा आयसीसी सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी नामांकन मिळाले आहे. बुमराहशिवाय इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट, पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांनादेखील नामांकन मिळाले. महिला गटात थायलंडची नताया बूचाथाम, आयर्लंडची गॅबी लुईस आणि एमियर रिचर्डसन यांना नामांकन मिळाले.
बुमराहने पहिल्या कसोटीत नऊ गडी बाद केले. दुसऱ्या कसोटीत त्याने मोहम्मद शमीसोबत नवव्या गड्यासाठी ८९ धावांची भागीदारी करीत भारतासाठी निर्णायक भूमिका बजावली. इंग्लिश कर्णधार रुटने तिन्ही कसोटीत शतके ठोकली. तो फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. आफ्रिदीने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटीत १८ गडी बाद केले. दुसऱ्या कसोटीत त्याने दहा गडी बाद केले होते.
बुमराहने मोडला कपिल देव यांचा विक्रमजसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण करताना कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. त्याने २४ डावांमध्ये १०० बळी घेत कपिल देव यांचा २५ डावांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी १९८० साली हा विक्रम केला होता, तेव्हापासून ते सर्वात कमी डावांत १०० कसोटी बळी घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज ठरले होते.
कमी डावांत १०० बळी घेणारे भारतीय वेगवान गोलंदाजजसप्रीत बुमराह (२०२१) : २४ डावकपिल देव (१९८०): २५ डावइरफान पठाण (२००८) : २८ डावमोहम्मद शमी (२०१८) : २९ डाव