Join us  

बुमराहने केली सिराजची पाठराखण

भारताच्या जसप्रीत बुमराहने दुसºया टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या लढतीत महागडा ठरलेल्या आपला सहकारी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची पाठराखण केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:05 AM

Open in App

राजकोट : भारताच्या जसप्रीत बुमराहने दुसºया टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या लढतीत महागडा ठरलेल्या आपला सहकारी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची पाठराखण केली. सिराज आपल्या चुकांतून बोध घेईल आणि भविष्यात चांगली कामगिरी करेल, असे जसप्रीत बुमराहने सांगितले.२३ वर्षीय सिराजला डावातील दुसरे षटक टाकण्याची संधी मिळाली. त्याने चार षटकांत ५३ धावांच्या मोबदल्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनची विकेट घेतली.बुमराह म्हणाला, ‘ही त्याची पहिलीच लढत होती. फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर गोलंदाजी करणे कधीच सोपे नसते. तो नव्यानेच संघात दाखल झालेला असून गोलंदाजांना ताळमेळ साधण्यास वेळ लागतो.’ न्यूझीलंडविरुद्ध दुसºया लढतीत ४० धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बुमराह म्हणाला, ‘एक गोलंदाज म्हणून ज्या वेळी तुम्हाला टार्गेट करण्यात येते त्या वेळी बरेच काही शिकायला मिळते. त्यामुळे या अनुभवानंतर तो पुढच्या लढतीत चांगला गोलंदाज म्हणून नक्की छाप सोडेल, असे मला वाटते.’एक गोलंदाज म्हणून तुमच्याविरुद्ध धावा फटकावल्या जातात, त्या वेळी तुम्हाला शिकायला मिळते. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे आव्हान असते. युवा गोलंदाजासाठी या प्रकारच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पदार्पणाची लढत खेळणे आव्हान असते. मी त्याचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न करीत होतो.या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येत होते. न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळाली. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केला आणि आक्रमक फलंदाजी करणारा कोलिन मुन्रो सुदैवीठरला. त्याचे काही झेल सुटले,असे बुमराह म्हणाला.सलामीवीरांना बाद करणेठरले निर्णायक : कोलिन मुन्रोफॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या सलामीवीर फलंदाजांना बाद करणे निर्णायक ठरले, असे न्यूझीलंडचा शतकवीर कोलिन मुन्रो याने विजयानंतर म्हटले आहे. भारताविरुद्ध दुसºया टी-२० क्रिकेट सामन्यातील न्यूझीलंडच्या विजयाचे श्रेय मुन्रो याने गोलंदाजांनाही दिले. डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्टने सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा याला तंबूत पाठवले. त्यामुळे भारताने १९७ धावांचा पाठलाग करताना ११ धावांवर दोन गडी गमावले होते.मुन्रो पत्रकार परिषदेत म्हणाला, की हा सामना शानदार होता. विकेट्समुळे भारताची लय थांबली. दोन चांगले फलंदाज बाद झाल्याने आम्हाला खूप फायदा झाला. अशा प्रकारची गोलंदाजी आम्हाला करावी लागेल. ज्यामुळे संघाचा आत्मविश्वास अधिक उंचावेल. जलदगती गोलंदाजानंतर फिरकीपटूंनी आपली भूमिका पार पाडली. भारताला रोखण्यात त्यांचाही वाटा आहे. मी टी-२० चा आनंद लुटतो. कधी कधी मोठ्या फॉरमॅटच्या सामन्यात आपल्यावर दबाव खूप असतो. परंतु, टी-२० त तुम्हाला अभिव्यक्त व्हावेच लागते. दरम्यान, मुन्रो याने सामन्यात विक्रमी भागीदारी केली. त्याच्या या योगदानामुळे पाहुण्या संघाने भारताविरुद्ध ४० धावांनी विजय मिळवला.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ