Join us  

सचिन तेंडुलकर बनला चीनी गेमचा सदिच्छादूत? भारतीय व्यापारी महासंघानं पाठवलं पत्र 

देशवासीयांच्या भावनांचा आदर करावा, अशी मागणी CAITनं केली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 9:05 PM

Open in App

Paytm First Gamesचा सदिच्छादूत म्हणून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची निवड झाली. त्यामुळे मंगळवारी ट्विटरवर #SachinIsBack असा ट्रेंड सुरू होता. पण, त्याची ही निवड वादात अडकण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अखिल भारतीय व्यापारी संघटनेनं ( CAIT) पत्र पाठवून तेंडुलकरवर टीका केली आहे. Paytm First Games मध्ये चीनी कंपनी Alibaba यांची गुंतवणूक असल्याचा दावा CAITने केला आहे. Paytm First Games हे Paytm आणि AG Tech of Alibaba यांनी मिळून स्थापन केलेली कंपनी आहे. त्यामुळे व्यापारी महासंघानं तेंडुलकरनं या कंपनीशी केलेला करार मोडावा, अशी विनंती केली आहे.

पाच वयस्कर खेळाडू IPL 2020 गाजवणार; कदाचित यापैकी काही पुढील IPL मध्ये दिसणारही नाहीत!

ज्युनियर रिषभ पंतची फटकेबाजी पाहिलीत का? नेटिझन्सनं केलाय कौतुकाचा वर्षाव

भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. त्यात TikTok, PUBG आदी अनेक अॅप व गेम्सचा समावेश आहे. CAITनं लिहिलं की,''भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. अशातही तेंडुलकर जो देशावर प्रेम करतो, तो चीनी गुंतवणूक असलेल्या अॅपचे सदिच्छादूतपद स्वीकारतो, हे आश्चर्यकारक आहे. आम्हाला खात्री आहे, तुझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही. मग कोणत्या गोष्टीमुळे तू या गेमला प्रमोट करत आहेस आणि देशातील प्रत्येक व्यक्तीलाही यामागचं कारण कळत नाही.''

'आम्ही विनंती करतो की तू तुझ्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि हा प्रस्ताव फेटाळावा,''असेही CAITने पत्रात म्हटले आहे.

भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर Vivoनं घेतली माघार

भारत- चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होऊ लागली आणि त्यामुळेच VIVOनं  टायटल स्पॉन्सरवरून माघार घेतली. त्यामुळे BCCIला नवा टायटल स्पॉन्सर सोधावा लागला.  ड्रीम 11नं टायटल स्पॉन्सरशीप मिळवली. स्पॉन्सरशिपसाठी ड्रीम 11नं 222 कोटींची बोली लावली, तर अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती.  ड्रीम 11वा टर्न ओव्हर 736 कोटींचा आहे. मुंबईतील हर्ष जैन व भावीत सेठ यांनी 2012मध्ये ही कंपनी सुरू केली. 2019मध्ये ही कंपनी भारतातील पहिली गेमींग कंपनी बनली. याच Dream 11नं आयपीएलसाठी एक गाणं तयार केलं आहे आणि त्यात टीम इंडियाचे दिग्गज गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

IPL 2020: महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक, शिखर खेळले 'गल्ली' क्रिकेट; पाहा Video

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

महेंद्रसिंग धोनीला Miss करतेय साक्षी; माहीला पाहण्याची व्यक्त केली इच्छा अन्... Video

क्रिएटिव्ह सौरव गांगुली; फोटोत दिसत होते पाकिस्तानी खेळाडू; दादानं केलं असं काही!

4 Days To Go: IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजात सात भारतीय!

JIO ग्राहकांसाठी नवा 'प्लॅन'; IPL2020 लाईव्ह पाहण्याचा करा 'प्लॅन'

   

टॅग्स :सचिन तेंडुलकरपे-टीएम