Cameron Boyce double hat-trick : बिग बॅश लीगमध्ये बुधवारी मोठमोठे विक्रम झाले. ग्लेन मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद १५४ धावांची खेळी केली आणि BBLमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. दुसऱ्या सामन्यात मेलबर्न रेनेगॅड्सच्या कॅमेरोन बॉयसनं ( Melbourne Renegades' Cameron Boyce) इतिहास घडवला. BBLमध्ये डबल हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. सिडनी थंडर्सविरुद्धच्या या लढतीत बॉयसनं Double Hat-Trick घेतली.
बॉयसनं अॅलेक्स हेल्स, जेसन संघा, अॅलेक्स रॉस व डॅनिएल सॅम्स यांना चार चेंडूंत माघारी पाठवून ही डबल हॅटट्रिक साजरी केली. सिडनी थंडर्सच्या डावातील सातव्या षटकाच्या अखेरच्या षटकात बॉयसनं सलामीवीर हेल्सला बाद केले. त्यानंतर ९व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर त्यानं तीन विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली. बॉयसच्या या कामगिरीनं सामन्याला कलाटणी मिळाली. हेल्स व उस्मान ख्वाजा यांच्या दमदार सुरूवातीनंतर थंडर्सचा डाव गडगडला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या होत्या. पण, त्यांना ८ बाद १७० धावाच करता आल्या.
BBLनं ट्विट केलं की, ''बॉयसने चार विकेट्स घेतल्यानंतर थंडर्सची अवस्था ८.३ षटकांत बिनबाद ८० वरून ४ बाद ८५ अशी झाली आहे.'' या सामन्यात बॉयसनं २१ धावा देताना पाच विकेट्स घेतल्या आणि म्हणून त्याला प्लेअर ऑफ दी मॅच म्हणुन गौरविण्यात आले. हेल्सनं ४४ आणि ख्वाजानं ७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रेनेगॅड्सचा कर्णधार आरोन फिंचनं ८२ धावांची खेळी केली, परंतु संघाला १ धावेनं हार मानावी लागली, उन्मुक्त चंदनं २९ धावा केल्या. रेनेगॅड्सला ७ बाद १६९ धावा करता आल्या.
Web Title: Cameron Boyce takes 'unbelievable' double hat-trick in BBL; becomes first to achieve feat in tournament, Sydney Thunder won by 1 run, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.