Cameron Boyce double hat-trick : बिग बॅश लीगमध्ये बुधवारी मोठमोठे विक्रम झाले. ग्लेन मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद १५४ धावांची खेळी केली आणि BBLमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. दुसऱ्या सामन्यात मेलबर्न रेनेगॅड्सच्या कॅमेरोन बॉयसनं ( Melbourne Renegades' Cameron Boyce) इतिहास घडवला. BBLमध्ये डबल हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. सिडनी थंडर्सविरुद्धच्या या लढतीत बॉयसनं Double Hat-Trick घेतली.
बॉयसनं अॅलेक्स हेल्स, जेसन संघा, अॅलेक्स रॉस व डॅनिएल सॅम्स यांना चार चेंडूंत माघारी पाठवून ही डबल हॅटट्रिक साजरी केली. सिडनी थंडर्सच्या डावातील सातव्या षटकाच्या अखेरच्या षटकात बॉयसनं सलामीवीर हेल्सला बाद केले. त्यानंतर ९व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर त्यानं तीन विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली. बॉयसच्या या कामगिरीनं सामन्याला कलाटणी मिळाली. हेल्स व उस्मान ख्वाजा यांच्या दमदार सुरूवातीनंतर थंडर्सचा डाव गडगडला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या होत्या. पण, त्यांना ८ बाद १७० धावाच करता आल्या.