IPL 2022, Crowd in Stadium Rules: 'आयपीएल'चे सामने स्टेडियममध्ये जाऊन बघायचा प्लॅन करताय? आधी 'हे' वाचा मगच तिकीट काढा

IPL 2022 चे सर्व सामने भारतातच होणार आहेत, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाता येईल का? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 03:01 PM2022-01-30T15:01:05+5:302022-01-30T15:06:29+5:30

whatsapp join usJoin us
Can I watch IPL matches in the stadium and how Find out what BCCI has planned according to sources | IPL 2022, Crowd in Stadium Rules: 'आयपीएल'चे सामने स्टेडियममध्ये जाऊन बघायचा प्लॅन करताय? आधी 'हे' वाचा मगच तिकीट काढा

IPL 2022, Crowd in Stadium Rules: 'आयपीएल'चे सामने स्टेडियममध्ये जाऊन बघायचा प्लॅन करताय? आधी 'हे' वाचा मगच तिकीट काढा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Crowd in Stadium Rule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2022 चे आयोजन करण्याचा निर्णय जवळपास नक्की केला आहे. कोरोना परिस्थितीमुळे भारतामध्ये सलग तिसर्‍या वर्षीही देशाबाहेर स्पर्धा नेली जाणार का, अशी शंका व्यक्त केली जात होती. तिसऱ्या लाटेचा धोका हळूहळू कमी होत असल्याने यंदाचा हंगाम भारतातच होणार असल्याची चर्चा जोर धरून लागली आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयमहाराष्ट्रातील चार ठिकाणी साखळी स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. त्यानंतर अहमदाबादच्या मैदानावर 'प्ले-ऑफ्स'चे सामने खेळवले जातील. महत्त्वाची बाब म्हणजे प्रेक्षकांची स्टेडियममध्ये उपस्थिती असेल की नसेल, याबद्दल आता BCCI नवा प्लॅन ठरवत आहे.

महाराष्ट्रातील सामने वानखेडे स्टेडियम, मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे गहुंजे स्टेडियम येथे होतील. दोन नवीन संघांसह एकूण ७० सामने पहिल्या फेरीत असतील. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार प्ले-ऑफ सामने होणार आहेत. IPL आयोजनाच्या काळात जर कोरोना रूग्णांची संख्या कमी असेल तर स्टेडियममध्ये जाऊन प्रेक्षकांना सामने पाहता येतील, असं सांगण्यात येत आहे.

"IPL आयोजनाच्या काळात पॉझिटिव्ह केसेसची संख्या जास्त नसल्यास राज्याच्या प्रशासनातील अधिकारी याविषयी चर्चा करून निर्णय घेतील. तसे झाल्यास या वर्षीच्या आयपीएलसाठी स्टेडियमच्या सुमारे २५% क्षमतेच्या प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ शकेल", असं महाराष्ट्र सरकारमधील एका बड्याने नेत्याने सांगितलं. त्यामुळे जर स्पर्धेसाठी प्रेक्षकांना परवानगी मिळाली तर तिकीटांची संख्या मर्यादित असेल. त्यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिकीट मिळण्यासाठी काही विशिष्ट नियमही असतील. त्यामुळे नियमावली वाचून व सर्व गोष्टींचा विचार करून मगच तिकीट काढण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात येईल. 

दरम्यान, IPL 2022 च्या सामन्यांची सुरूवात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. ही स्पर्धा मे महिन्याच्या अखेरपर्यंत रंगले असं BCCI कडून स्पष्ट करण्यात आलंय. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी यंदाच्या हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे.

Web Title: Can I watch IPL matches in the stadium and how Find out what BCCI has planned according to sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.