7 धावांत 6 विकेट, किवी गोलंदाजानं केली नववर्षाची दणक्यात सुरुवात!

कायले जॅमीएसनने 2019 वर्षाची सुरुवात दणक्यात केली. त्याने न्यूझीलंडच्या स्थानिक ट्वेंटी-20 लीगमध्ये पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:47 PM2019-01-01T15:47:06+5:302019-01-01T15:47:25+5:30

whatsapp join usJoin us
Canterbury Kings' Kyle Jamieson has taken the best ever figures by a New Zealander in T20s | 7 धावांत 6 विकेट, किवी गोलंदाजानं केली नववर्षाची दणक्यात सुरुवात!

7 धावांत 6 विकेट, किवी गोलंदाजानं केली नववर्षाची दणक्यात सुरुवात!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑकलंड : कायले जॅमीएसनने 2019 वर्षाची सुरुवात दणक्यात केली. त्याने न्यूझीलंडच्या स्थानिक ट्वेंटी-20 लीगमध्ये अवघ्या सात धावांत 6 विकेट घेत पराक्रम केला. न्यूझीलंडच्या स्थानिक ट्वेंटी-20 लीगमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे, तर जगभरातल्या ट्वेंटी-20 लीगमधील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. कँटेबरी किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 24 वर्षीय जॅमीएसनने ऑकलंड एसेसचा संपूर्ण डाव 110 धावांत गुंडाळला. 2016 मध्ये त्याने सुपर स्मॅश ट्वेंटी-20 लीगमध्ये पदार्पण केले होते. 2019 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने पराक्रम करताना राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले आहे. किंग्जने 17.4 षटकांत पाच विकेट राखून विजय निश्चित केला.



जॅमीएसनने ( 6/7) या कामगिरीसह श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केली. मलिंगाने बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळताना डिसेंबर 2012 मध्ये पर्थ स्कॉचर्सविरुद्ध ही कामगिरी केली होती. अरुण सुपीआह ( 6/5) आणि शकिब अल हसन ( 6/6) हे या विक्रमात आघाडीवर आहे. 

न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूला ट्वेंटी-20 लीगमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही. इश सोधीने बिग बॅश लीगमध्ये 11 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. त्याआधी इयान बटलर आणि बेन लॉघलीन यांनी 28 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. जॅमीएसनने पहिल्याच षटकात विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या षटकात दोन विकेट घेतल्या. सामन्याच्या 18 व्या षटकात त्याने चार चेंडूंत 3 विकेट घेतल्या. 


 

Web Title: Canterbury Kings' Kyle Jamieson has taken the best ever figures by a New Zealander in T20s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.