Join us

‘कॅप्टन कूल’ धोनी @३९, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

आता चर्चा ही आहे की धोनी केव्हा निवृत्ती स्वीकारणार. कारण गेल्या वर्षभरापासून त्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण ही केवळ चर्चा आहे. धोनीने नेहमीप्रमाणे आपले पत्ते उघड करण्यासाठी घाई केलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 03:27 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधार आणि सर्वांचा लाडका क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी ३९ वर्षांचा झाला आहे आणि विभिन्न पातळीवर त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत, पण त्याने नेहमीप्रमाणे सोशल मीडियाच्या झगमगाटापासून दूर राहण्यालाच पसंती दिली.आता चर्चा ही आहे की धोनी केव्हा निवृत्ती स्वीकारणार. कारण गेल्या वर्षभरापासून त्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण ही केवळ चर्चा आहे. धोनीने नेहमीप्रमाणे आपले पत्ते उघड करण्यासाठी घाई केलेली नाही.त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्याला वेगळ्या शैलीने शुभेच्छा दिल्या, पण त्यात आदर होता. मोहम्मद कैफने त्याला शुभेच्छा देताना टिष्ट्वट केले, ‘भविष्यातील एमएसडी (महेंद्रसिंग धोनी)? चूक झाली ४०४, भविष्यातील एमएसडी कधीच भेटणार नाही.’ वीरेंद्र सेहवागसारख्या सुपरस्टारपासून केदार जाधवसारख्या खेळाडूचे त्याच्याप्रति आदर व प्रेमाचे आश्चर्य वाटत नाही. धोनीचे चाहते मैदानावरील त्याच्या कामगिरीपेक्षा विश्वासपात्र व्यक्ती म्हणून अधिक प्रेम करतात. (वृत्तसंस्था)सेहवागने आपल्या टिष्ट्वटर पेजवर लिहिले, ‘एका पिढीत एकदा एक खेळाडू होत असतो आणि देश त्याच्यासोबत जुळतो. त्याला आपल्या कुटुंबातील सदस्यासारखे मानतात. तो आपलाच वाटतो. अशा व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ही व्यक्ती अनेकांसाठी त्यांचे जग आहे.’ जाधवने यावेळी मराठीमध्ये एक मोठे पत्र लिहित माहीप्रति आपले प्रेम व आदर व्यक्त केला. हार्दिक पांड्याने धोनीला शुभेच्छा देताना लिहिले, ‘माझा मित्र, ज्याने मला शानदार व्यक्ती होण्याची शिकवण दिली आणि माझ्या वाईट दिवसांमध्ये तो माझ्यासोबत राहिला.’

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ