कोणत्याही व्यावसायीक लीगचा सामना संपल्यावर खेळाडूंमधील खुन्नस सगळ्यांनाच बघायला मिळते. मात्र क्रिकेटला जंटलमन्स गेम असे का म्हणतात. हे त्यातील खेळाडूंच्या वागण्यावरून दिसून येते. त्यात जर एखाद्या ज्युनियर खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघातील वरिष्ठांना काही टिप्स
मागितल्या तरी त्या लगेच दिल्या गेल्याचे दुर्मिळ उदाहरण आयपीएलमध्ये दिसून आले.
चेन्नई सुपर किंग्जकडून सनरायजर्स हौदराबादचा पराभव झाला. त्यानंतर सनरायजर्सच्या युवा खेळाडूंनी विजेत्या संघाचा कर्णधार आणि महान खेळाडू महेंद्र सिंह धोनी याला काही टिप्स मागितल्या. धोनीनेही कोणताही आडपडदा न ठेवता त्याच्या कारकिर्दीतील अनुभवाने या खेळाडूंना टिप्स दिल्या. यामुळे सोशल मिडियात महेंद्र सिंह धोनीची वाहवा सुरू होती. त्याच्या या कृतीने त्याच्या बद्दलचा आदर दुणावला असल्याचे सोशल मिडियावर म्हटले गेले. तसेच युवा खेळाडू त्याचा का आदर करतात हे देखील यातून समजले.
याआधी देखील राजस्थानचा सलामीवीर १९ वर्षांच्या यशस्वी जैस्वाल याने सामन्याच्या आधी धोनीला पाहून हात जोडले होते. हा व्हिडियो देखील सोशल मीडीयात चांगलाच व्हायरला झाला होता. त्यातून धोनी बद्दल युवा खेळाडूंमध्ये किती आदर हे दिसून येते. तसेच राजस्थानचा राहुल तेवतिया आणि सनरायजर्सचा खलील अहमद यांच्यातील भांडण देखील सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने सोडवले होते. त्यावेळी वॉर्नरने राहुलला शांत केले होते.
Web Title: Captain CooL m.s. dhoni l taught after the match; Rare example seen in IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.