वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेणारा महेंद्रसिंग धोनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार अशी शक्यता आहे. पण, तसं होईलच असे नाही आणि त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान धोनीला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. पण, एक अशी चर्चा आहे की धोनी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. संजय दत्तसोबत एका चित्रपटात धोनी दिसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Doghouse असे या चित्रपटाचे नाव असून संजय दत्त या चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्ट आहे. संजय दत्तसह या चित्रपटात आणखी काही मोठी नावं असल्याचीही चर्चा आहे. त्यात प्रामुख्यानं सुनील शेट्टी, इम्रान हाशमी आणि आर माधवन यांची नाव चर्चेत आहेत. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले, तर धोनीही बॉलिवूड स्टार्ससोबत या चित्रपटात दिसेल. पद्मावत चित्रपटातील जीम सर्भ Doghouseमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 29 ऑक्टोबरला चित्रपटातील सर्व स्टार कास्टची घोषणा करण्यात येणार आहे.
No Country For Old Men या हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटावर आधारीत Doghouse हा चित्रपट आहे. 2020मध्ये त्याच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. पण, त्यात भूमिका साकारण्यासाठी धोनी राजी होतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वरूण धवनसोबत धोनी सुरु करणार नवी इनिंग! बनणार निर्माता!!धोनीने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवायचे ठरवले आहे. हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा प्रोड्यूस करण्याचा निर्णय धोनीने घेतला आहे. धोनीने या चित्रपटाचे राईट्सही खरेदी केले आहेत. या चित्रपटात वरूण धवन मेजर ध्यानचंदची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिल्यानंतर वरूणला ध्यानचंद यांच्या बायोपिकसाठी फायनल करण्यात आल्याचे कळतेय. करण सध्या ‘जुडवा2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका आहेत. गतवर्षी एम एस धोनीच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.