'कॅप्टन कूल' धोनीचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सध्या खराब फॉर्मशी संघर्ष सुरू आहे. पण, याच दिवशी बरोबर 13 वर्षांपूर्वी कॅप्टन कूल धोनीने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 12:21 PM2018-10-31T12:21:57+5:302018-10-31T12:22:53+5:30

whatsapp join usJoin us
'Captain Cool' Ms Dhoni's 13-year-old record still remains | 'कॅप्टन कूल' धोनीचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित

'कॅप्टन कूल' धोनीचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सध्या खराब फॉर्मशी संघर्ष सुरू आहे. पण, याच दिवशी बरोबर 13 वर्षांपूर्वी कॅप्टन कूल धोनीने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. 31 ऑक्टोबर 2005 मध्ये जयपूरच्या सवाई मान सिंह स्टेडियमवर झालेल्या वन डे सामन्यात धोनीने 145 चेंडूंत 186 धावा चोपल्या होत्या. यष्टिरक्षकाने केलेली ती सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती आणि आजही तो विक्रम अबाधित आहे. धोनीने तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टचा 172 धावांचा विक्रम मोडला होता. 
यष्टिरक्षकांची सर्वोत्तम खेळी
महेंद्रसिंग धोनीः नाबाद 183 धावा, 2005 ( वि. श्रीलंका ) 
क्विंटन डी कॉकः 178 धावा, 2016 ( वि. ऑस्ट्रेलिया)
अॅडम गिलख्रिस्टः 172 धावा, 2004 ( वि. झिम्बाब्वे) 



त्या सामन्यात श्रीलंकेने 299 धावांचे लक्ष्य देत भारतीय संघावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. कुमार संगकाराने 138 धावा केल्या होत्या. या सामन्यात कर्णधार राहुल द्रविडने धोनीला तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजीला बोलावले. धोनीने श्रीलंकेच्या चामिंडा वास आणि मुथय्या मुरलीधरन या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 40 चेंडूंत अर्धशतक आणि 85 चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने 183 धावांच्या खेळीत 15 चौकार व 10 षटकार खेचले. भारताने हा सामना 46.1 षटकांत 6 विकेट राखून जिंकला होता. 

Web Title: 'Captain Cool' Ms Dhoni's 13-year-old record still remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.