टीमकडून नाही मिळालं कॅप्टनला बर्थ-डे गिफ्ट, विराटने फलंदाजांना धरलं जबाबदार 

पहिल्या टी 20 मधील पराभवाचे उट्टे काढताना न्यूझीलंडने दुस-या सामन्यात भारतावर 40 धावांनी विजय मिळवला. कॉलिन मुन्रोच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दिलेल्या 1977 धावांचे लक्ष्यासमोर भारताची फलंदाजी ढेपाळली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 08:47 AM2017-11-05T08:47:57+5:302017-11-05T08:50:21+5:30

whatsapp join usJoin us
Captain gets berth-day gift, Virat batsmen responsible for not getting team | टीमकडून नाही मिळालं कॅप्टनला बर्थ-डे गिफ्ट, विराटने फलंदाजांना धरलं जबाबदार 

टीमकडून नाही मिळालं कॅप्टनला बर्थ-डे गिफ्ट, विराटने फलंदाजांना धरलं जबाबदार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजकोट - पहिल्या टी 20 मधील पराभवाचे उट्टे काढताना न्यूझीलंडने दुस-या सामन्यात भारतावर 40 धावांनी विजय मिळवला. कॉलिन मुन्रोच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दिलेल्या 1977 धावांचे लक्ष्यासमोर भारताची फलंदाजी ढेपाळली. विराट कोहलीचे अर्धशतक आणि महेंद्रसिंह धोनी (49) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. जर हा सामना भारताने जिंकला असता तर भारताने मालिकेवर कब्जा मिळवला असताच शिवाय बर्थडे बॉय कॅप्टन विराट कोहलीसाठी ते मोठं गिफ्ट ठरलं असतं. कारण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 29 वा वाढदिवस आहे. राजकोटच्या मैदानात टीम इंडिया हरली, त्यामुळे साहजिकच विराट कोहलीच्या 29 व्या वाढदिवसाच्या आनंदावर थोडंसं विरजण पडलंय. पण रात्री 12 वाजता ड्रेसिंग रुममध्ये केक कापून विराटचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सामना संपल्यानंतर बोलताना कोहलीने या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरलं. फलंदाज चांगलं प्रदर्शन करू शकले नाहीत. जेव्हा तुम्ही 200 धावांचा पाठलाग करत असतात त्यावेळी सर्व फलंदाजांनी धावा काढणं आवश्यक असतं किंवा कोणा एका फलंदाजाने तरी 200 च्या स्ट्राइक रेटने खेळण्याची गरज असते, मी पूर्ण प्रयत्न केले. अखेरीस धोनीनेही चांगला खेळ केला पण आमचं काम खूप कठीण झालं होतं असं कोहली म्हणाला. 
या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 197 धावांचे लक्ष्यासमोर भारताची फलंदाजी ढेपाळली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुन्रोने आपल्या तुफानी खेळीने न्यूझीलंडला १९६ ही धावसंख्या उभारून दिली. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवातच खराब झाली. दुसºयाच षटकांत दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्या वेळी धावफलकावर फक्त ११ धावाच होत्या. रोहित शर्माला पाच धावांवर बोल्टने बाद केले. तर शिखरलाही बोल्टनेच तंबूत परत पाठवले. तिस-या क्रमांकावर आलेल्या अय्यर याने २१ चेंडूत २३ धावा केल्या. मात्र मुन्रोने त्याला झेलबाद केले. दहाव्या षटकांत ईश सोढीने हार्दिक पांड्याला बाद केले. त्यानंतर महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने भारताच्या आशा वाढवल्या. मात्र १७ व्या षटकांत मिशेल सेंटनर याने कोहलीला ग्लेन फिलीप्सकडे झेल देण्यास भाग पाडले. कोहलीने ४२ चेंडूत एक षटकार आणि ८ चौकारांच्या साहाय्याने ६५ धावा केल्या. तर महेंद्रसिंह धोनी याने ४९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या बोल्टने चार षटकांत ३४ धावा देत चार गडी बाद केले. तत्पूर्वी सामना खरा गाजवला तो कॉलिन मुन्रो याने. त्याने गुप्तीलच्या साथीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली. गुप्तील याने ४१ चेंडूत ४५ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. या सामन्यात भारताकडून पर्दापण करणाºया जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजचे स्वागत दोन्ही फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करून केले. सिराज ने या सामन्यात ४ षटकांत तब्बल ५३ धावा दिल्या. सिराजच्या दुसºया षटकांत मुन्रोने लॉंग आॅन आणि मिडवकेटवर षटकार ठोकले. तर गुप्तीलने चहलला मिडविकेटवर षटकार ठोकला. तर भुवनेश्वरच्या चेंडूवर मुन्रो सीमा रेषेवर झेलबाद होता होता वाचला.मुन्रोने ७ चौकार आणि ७ षटकांराच्या मदतीने ५८ चेंडूतच १०९ धावा केल्या. तर बुमराहने ४ षटकांत २३ धावा दिल्या. मालिकेतील अखेरचा सामना ७ नोव्हेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. (वृत्तसंस्था)

धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे.पांड्या गो. चहल ४५, मुन्रो नाबाद १०९, केन विल्यम्सन झे. शर्मा गो. सिराज १२, टॉम ब्रुस नाबाद १८, अतिरिक्त १२. एकूण २० षटकांत २/१९६. गोलंदाजी - भुवनेश्वर कुमार - ४-०-२९-०, मोहम्मद सिराज - ४-०-५३-१, जसप्रीत बुमराह-४-०-२३-०, युझवेंद्र चहल ४-०-३६-१, अक्षर पटेल ३-०-३९-०, हार्दिक पांड्या १-०-१४-०.
भारत : रोहित शर्मा झे. फिलीप्स गो. बोल्ट ५, शिखर धवन गो. बोल्ट १, श्रेयस अय्यर झे. गो. मुन्रो २३,विराट कोहली झे.फिलीप्स गो. सेंटनर ६५, हार्दिक पांड्या गो.सोढी १, महेंद्र सिंह धोनी झे. सेंटनर, गो.बोल्ट ४९, अक्षर पटेल झे. विल्यम्सन गो. बोल्ट५, भुवनेश्वर कुमार नाबाद २, जसप्रीत बुमराह १ अतिरिक्त ४, एकुण २० षटकांत ७ बाद १५६. गोलंदाजी - अ‍ॅडम मिल्ने ४-०-३०-०, ट्रेंट बोल्ट ४-०-३४-४, कॉलीन डी ग्रॅण्ड होम १-०-१०-०, मिशेल सेंटनेर ४-०-३१-१, ईश सोढी ४-०-२५-१, कॉलिन मुन्रो ३-०-२३-१

Web Title: Captain gets berth-day gift, Virat batsmen responsible for not getting team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.