SMAT : कॅप्टन Rajat Patidar ची बॅट तळपली! षटकार-चौकारांची 'बरसात' अन् MP नं गाठली फायनल

फायनलमध्ये MP समोर MUM चं चॅलेंज; कोण उंचावणार ट्रॉफी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:16 IST2024-12-14T07:07:40+5:302024-12-14T07:16:29+5:30

whatsapp join usJoin us
Captain Rajat Patidar's bat shines! A shower of sixes and fours and MP reaches the final | SMAT : कॅप्टन Rajat Patidar ची बॅट तळपली! षटकार-चौकारांची 'बरसात' अन् MP नं गाठली फायनल

SMAT : कॅप्टन Rajat Patidar ची बॅट तळपली! षटकार-चौकारांची 'बरसात' अन् MP नं गाठली फायनल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Syed Mushtaq Ali Trophy Rajat Patidar Madhya Pradesh vs Mumbai Final : सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात रजत पाटीदार याचा जलवा पाहायला मिळाला. एम चिन्नास्वामी  स्टेडियमवर रंगलेल्या  दिल्ली (Delhi) विरुद्धच्या सामन्यात मध्य प्रदेश संघानं (Madhya Pradesh) धमाकेदार विजय नोंदवला.  नेतृत्व करताना बॅटिंगमधील कर्तृव दाखवून देत रजत पाटीदार याने आपल्या संघाला फायनलमध्ये नेण्यास  पुढाकार घेतला.  

तोकड्या धावसंख्येचा पाठलाग करताना अनुभव इशांतसमोर MP ची अडखळत सुरुवात 

मध्य प्रदेश संघाची सुरुवात खराब झाली होती. अनुभवी इशांत शर्मा आणि हिमांशूनं आघाडी्च्या फलंदाजांना स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवून दिल्लीसाठी फायनलच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मध्य प्रदेशचा सलामीवीर अर्पित गौडला इशांतनं खातही उघडू दिलं नाही.  विकेट किपर बॅटर हर्ष गवळी १८ चेंडूत ३० धावांची फटकेबाजी करून तंबूत परतला. सुभरांशु सेनापती अवघ्या ७ धावांवर परतला. संघाची अवस्था ३ बाद ४६ धावा अशी असताना कर्णधार रजत पाटीदार यानं हरप्रीत भाटीयासोबत डााव सावरण्याची जबाबदारी सांभाळली. या दोघांनीच संघाचा विजय निश्चित केला. 

षटकार चौकारांची 'बरसात' २९ चेंडूत ६६ धावांची खेळी

रजत पाटीदार याने हरप्रीत सिंग भाटीयाच्या साथीनं शतकी भागीदारी करत संघाला १६ व्या षटकातच विजय नोंदवून दिला. IPL मध्ये RCB च्या ताफ्यातून खेळणाऱ्या या गड्यानं २९ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांची बरसात करत ६६ धावा कुटल्या. दुसऱ्या बाजूला हरप्रीत सिंगनं ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ४६ धावांची खेळी करत कॅप्टनला सुरेख साथ दिली.


दिल्लीकडून फलंदाजीत अनुज रावत तर MP कडून गोलंदाजीत व्यंकटेश अय्यर ठरला टॉपर

दुसऱ्या उंपात्य सामन्यात २०१८ चा विजेता दिल्ली संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना धावफलकावर तोकड्या धावा लावल्या होत्या. निर्धारित २० षटकात संघानं ५ बाद १४६ धावा केल्या. विकेट किपर अनुज रावतनं संघाकडून सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. यात त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला. त्याच्याशिवाय मयांक रावत २४(२१), सलामीवीर प्रियांस अर्या २९ (२१), यश धुल ११ (१८), हिमंत सिंग १५(१४) आणि कर्णधार आयुष बडोनी यांने १६ चेंडूत १९ धावांचे योगदना दिले होते. मध्य प्रदेशकडून गोलंदाजीत  व्यंकटेश अय्यरनं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय त्रिपुरेश सिंग, आवेश खान आणि कुमार कार्तिकेया यांनी प्रत्येकी एक एक विकेट्स मिळवली.

फायनलमध्ये MP समोर MUM चं चॅलेंज; कोण उंचावणार ट्रॉफी?

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात बडोदा संघाला शह देत फायनल गाठली होती. आता दुसऱ्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशच्या संघानं दिल्लीला शह देत फायनलचे तिकीट मिळवले आहे. १५ डिसेंबरला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात ट्रॉफीसाठी अंतिम सामना रंगेल. यात कोण बाजी मारणार ते पाहण्याजोगे असेल. 

 

Web Title: Captain Rajat Patidar's bat shines! A shower of sixes and fours and MP reaches the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.