Join us  

T20 World Cup, INDvsENG : रोहित शर्माला दुखापत; इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी भारताला मोठा धक्का!

Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबद्दल अद्याप काही समजू शकले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 7:47 AM

Open in App

अ‍ॅडलेड : येत्या गुरुवारी म्हणजेच 10 नोव्हेंबरला आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या मनगटाला दुखापत झाली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना त्याच्या मनगटाला दुखापत झाली.

कर्णधार रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटावर दुखापत झाली आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्माला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबद्दल अद्याप काही समजू शकले नाही. अ‍ॅडलेडमध्ये सरावादरम्यान रोहित शर्माच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला सराव अर्ध्यावर सोडावा लागला. दरम्यान, रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे, यावर अजूनतरी बीसीसीआयकडून (BCCI) कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

गुरुवारीच उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. त्यामुळे जर रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर पडल्यास भारतीय संघाला उपांत्य फेरीपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्याच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार रोहित शर्माने पाच सामन्यांत फलंदाजी करताना 89 धावा केल्या आहेत.

टॅग्स :रोहित शर्माट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ऑफ द फिल्ड
Open in App