Rohit Sharma : टीम इंडियाने T20 वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात आली. सकाळी ६ वाजता टीम इंडिया दिल्लीत पोहोचली होती, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर विश्वविजेत्या टीम इंडियाचे मुंबईत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात व्हिक्ट्री परेडचे आयोजन केले होते, यासाठी मोठी गर्दी होती. मरीन ड्राईव्हवर विजयी परेड झाल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंना १२५ कोटी रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले, यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या घरी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रोहित शर्माच्या बालपणीच्या मित्रांनी त्याला खांद्यावरुन घरी घेऊन गेले, यावेळी तिलक वर्मा यांचीही उपस्थिती होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान अनेकांची तब्येत बिघडली; चेंगराचेंगरीनंतर १० जण रुग्णालयात
कर्णधार रोहित शर्मा ज्यावेळी त्याच्या घराजवळ गेला, त्यावेळी त्याचे बालपणीच्या मित्रांनी सॅल्युट केले. यानंतर सर्वांनी त्याला खांद्यावर उचलले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
२९ जून रोजी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून T20 वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपद पटकावले. वेळापत्रकानुसार हा संघ १ जुलैला मायदेशी परतणार होता, मात्र बार्बाडोसमधील वादळामुळे खेळाडू तिथेच अडकले. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना विशेष चार्टर्ड विमानाने देशात आणले. टीम इंडियाने काल ४ जुलै रोजी दिल्ली आणि मुंबईत हा विजय साजरा केला.
टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान मोठी गर्दी
टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडसाठी मरिन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांमी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र या सेलिब्रेशनच्या नादात काही चाहत्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी आणि खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीत चेंगाचेंगरीमुळे आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागले.