बंगळुरू, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाची चव चाखवत मालिका 2-0ने खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने 190 धावांचे लक्ष्य 7 विकेट आणि 2 चेंडू राखून पार केले. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 113 धावांची तुफान खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत दोन्ही वेळा धावांचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला प्रथमच मालिकेत हार मानण्यास भाग पाडले. कोहलीच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर भारतीय संघ कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत प्रथमच पराभूत झाला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर आतापर्यंत 16 मालिका खेळला आहे. त्यापैकी सात कसोटी, पाच वन डे आणि 3 ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघाला एकदाही हार मानावी लागली नाही. मागील 15 पैकी 14 मालिकांत कोहलीनं विजय मिळवला आहे, तर एक मालिका बरोबरीत सुटली. पण, 16व्या मालिकेत कोहलीला पराभव पत्करावा लागला. अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 11 वर्षांत प्रथमच भारताला ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला.
ट्वेंटी-20 क्रिकेट मालिकांच्या इतिहासात भारतीय संघाला केवळ चार वेळाच द्विदेशाय मालिका गमवाव्या लागल्या आहेत. यापैकी तीन मालिका पराभव हे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली स्वीकारावे लागले आहेत. यापूर्वी इंग्लंडने ( 1-0) 2011-12, न्यूझीलंडने ( 1-0) 2012 आणि दक्षिण आफ्रिकेने ( 2-0) 2015-16 मध्ये भारताला ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत केले आहे. भारताच्या 4 बाद 190 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 113 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकांत 3 बाद 194 धावा करत मालिका 2-0 अशी जिंकली.
महेंद्रसिंग धोनीचा विक्रममहेंद्रसिंग धोनीनं 526 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 352 षटकार खेचले आहेत आणि सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये तो पाचव्या स्थानावर आहे. या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ( 506) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शाहिद आफ्रिदी, ब्रेंडन मॅकलम आणि सनथ जयसूर्या यांचा क्रमांक येतो.
Web Title: Captain Virat Kohli suffers 'unwanted first', unbeaten run of 15 home series across formats comes to end
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.