कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम घडत असतात. मात्र कसोटी सामन्यात विजयी संघाच्या कर्णधाराने कोणतेही योगदान न दिल्याची कामगिरी अजबच म्हणावी लागेल. नुकत्याच झालेल्या श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यात लंकेचा कर्णधार सुरंगा लकमल याने हा विक्रम केला.
लकमल याने या सामन्यात एकही धाव केली नाही. एकही झेल घेतला नाही. बळीही घेतला नाही किंवा त्याने फलंदाजाला यष्टिचीत, धावबादही केले नाही. तरीही त्याचा संघ जिंकला. या यादीत लकमल हा बारावा कर्णधार आहे.
या यादीत सर डॉन ब्रॅडमन, क्लाईव्ह लॉयड, सर व्हिव्हीयन रिचर्ड्स, स्टिव्ह वॉ या सारख्या दिग्गज कर्णधारांचा समावेश आहे.
या यादीत पहिले नाव आहे ते आॅस्ट्रेलियाचे कर्णधार बिल वुडफॉल यांचे. त्यांनी १२ फेब्रुवारी १९३२ रोजी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात कोणतेही योगदान दिले नव्हते. त्यानंतर विंडीजचे जॅकी ग्रांट यांनी इंग्लंड विरोधात १४ मार्च १९३५ रोजी या कामगिरीच पुनरावृत्ती केली.
महान क्रिकेटपटू आणि आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांनीही अशीच कामगिरी आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात केली.१४ आॅगस्ट १९४८ रोजी झाल्या या सामन्यात प्रतिस्पर्धी इंग्लंडचा संघ रे लिंडवॉल यांच्या ६ बाद २० धावा या कामगिरीमुळे पहिल्या डावात ५२ धावातच तंबूत परतला. ब्रॅडमन पहिल्या डावात शून्यावर बाद झाले. मात्र त्यांचे सहकारी आर्थर मारीस यांच्या १९६ धावांमुळे आॅस्ट्रेलियाने ३८९ धावा केल्या. आणि दुसºया डावातही इंग्लंडचा संघ फक्त १८८ धावाच जमवू शकला. त्यामुळे ब्रॅडमन यांना दुसºया डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. आणि त्यांच्या नावावर या कामगिरीची नोंद झाली.
या यादीत आॅस्ट्रेलियाचे इयान क्रेग, विंडिज्चे क्लाईव्ह लॉयड, सर व्हिव्हियन रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेच्या हॅन्सी क्रोनिये, आॅस्ट्रेलियाच्या स्टिव्ह वॉ, श्रीलंकेच्या मार्वन आट्टापटू आणि पाकिस्तानच्या इंझमाम उल हक यांचाही समावेश समावेश आहे. या यादीतील १२ वा कर्णधार सुरंगा लकमल ठरला. त्याने २० जुलैला कोलंबो कसोटीची कामगिरी केली.
Web Title: Captain who won the Test without any contribution, suranga lakmal's record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.