कोरोना संकटात क्रिकेटप्रेमींसाठी आता एकएक गुड न्यूज येऊ लागल्या आहेत. इंग्लंड - वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनंतर आता इंग्लंड-आयर्लंड, इंग्लंड-पाकिस्तान आदी आंतरराष्ट्रीय मालिकांसह स्थानिक ट्वेंटी-20 लीगलाही सुरुवात होणार आहे. श्रीलंकेतील ट्वेंटी-20 लीग 28 ऑगस्टपासून सुरू होत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचाही ( आयपीएल 2020) मार्ग मोकळा झाला असून 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे रंगणार आहे. आयपीएलसाठी आता केवळ केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. येत्या आठवडाभरात आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रकही जाहीर केले जाईल. त्याआधी आणखी एका ट्वेंटी-20 लीगचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.
बोंबला! पाकिस्तान संघाची सर्व उपकरणे जप्त होणार; परवेझ मुशर्रफ यांचा करार महागात पडणार
कॅरेबीयन प्रीमिअर लीग ( CPL 2020) चे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. जगभरातील सर्व ट्वेंटी-20 लीगमध्ये कॅरेबीयन लीगचीही प्रचंड चर्चा आहे. 18 ऑगस्टपासून या लीगला सुरू होणार असून 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. टॉरूबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत 23 आणि पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर 10 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. 10 सप्टेंबरला लीगचा अंतिम सामना होईल.
पाहा संपूर्ण वेळापत्रक