टी २० वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष काल मुंबईत साजरा झाला. त्यापूर्वी भारतीय संघ सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेला होता. आज मुंबईकर असलेले भारतीय संघातील खेळाडू महाराष्ट्राच्या विधानसभेत आले होते. तिथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सूर्यकुमार यादवने अस्खलीत मराठीतून विधानसभा आणि परिषदेतील आमदार, कर्मचाऱ्यांसमोर भाषण केले.
"तर मी सूर्याला बसवलं असतं.."; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, सभागृहात पिकला हशा
मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मला इथे बोलायची संधी दिली. जे मी काल बघितले ते मी विसरू शकत नाही. आज जे पाहतोय ते देखील मी कधी विसरू शकत नाही. मी काय बोलू, माझे शब्द संपले. कॅच बसला हातात. कसा असा असे म्हणत सूर्याने अॅक्शन करून दाखविली.
मुंबई पोलिसांनी काल जे केले ते इतर कोणाही करू शकत नाही. आपण आणखी एक वर्ल्ड कप जिंकू, असे आश्वासनही सूर्याने विधानसभेतून दिले. महत्वाचे म्हणजे सूर्याने हे सर्व अस्खलित मराठीतून सांगितले.
विधानसभेत येण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चौघांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. याचबरोबर गोलंदाजांचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी रोहितनेही विधानसभेत चांगली फटकेबाजी केली.