Indian Premier League ( IPL 2020) च्या १३ व्या पर्वात फॅफ ड्यू प्लेसिस, अनुकूल रॉय, ग्लेन मॅक्सवेल यांनी टिपलेल्या झेलची हवा आहे. पण, काल दिवसभर पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) यानं जगाला अचंबित करणारी कॅच घेतली. पाकिस्तानमध्ये नॅशनल ट्वेंटी-२० कप सुरू आहे. मंगळवारी सिंध आणि खिबर पख्तुंख्वा यांच्यात सामना झाला आणि यात २८ वर्षीय रिझवाननं यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम झेल टिपला.
सिंध संघाच्या डावाच्या १९व्या षटकात हा अप्रतिम झेल घेतला गेला. सिंध संघाला १२ चेंडूंत २८ धावांची गरज होती आणि फलंदाज अन्वर अलीनं हा फटका मारला होता. त्यानं टोलावलेला चेंडू नो मॅन्स लँडवरच पडणार होता, परंतु रिझवानच्या डोक्यात काही वेगळंच सुरू होतं. हा झेल गोलंदाजाला घेता आला असता, पण, रिझवान कुठून धावत आला आणि झेल घेतला. पण, या विकेटनंतरही रिझवानच्या संघाला विजय मिळवता आला नाही. दानिष अझीझनं अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार खेचला. सिंधला १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. उस्मान शिनवारीनं ३६ धावा केल्या. अझीझनं ४७ चेंडूंत नाबाद ७२ धावा चोपल्या.
पाहा झेल...
Web Title: Catch Of The Year? Watch As Mohammad Rizwan Takes Outrageous Catch Without Wicketkeeping Gloves
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.