Join us  

यजमान इंग्लंडची सावध सुरुवात; विंडीजविरुद्ध दुसऱ्या डावात कूर्मगती फलंदाजी

इंग्लंडचा पहिला डाव २०४ संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना वेस्ट इंडिजने ३१८ धावांची मजल मारली. इंग्लंडकडे दुसºया डावात ५४ धावांची आघाडी असून त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. कसोटीत चार सत्रांचा खेळ शिल्लक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 1:55 AM

Open in App

साऊथम्पटन : सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स व डोम सिबले यांनी सावध फलंदाजी करीत इंग्लंडला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दुसºया डावात शनिवारी चौथ्या दिवशी चहापानापर्यंत ३ बाद १६८ धावांची मजल मारुन दिली.इंग्लंडचा पहिला डाव २०४ संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना वेस्ट इंडिजने ३१८ धावांची मजल मारली. इंग्लंडकडे दुसºया डावात ५४ धावांची आघाडी असून त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. कसोटीत चार सत्रांचा खेळ शिल्लक आहे.चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात खेळ संथ होता. आज पहिल्या सत्रात केवळ बर्न्स बाद झाला. रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बर्न्स बॅकवर्ड पॉर्इंटला जॉन कॅम्पबेलकडे झेल देत माघारी परतला. त्याने १०४ चेंडूंना सामोरे जाताना ४२ धावा केल्या.इंग्लंडने प्रेक्षकाविना रोस बाऊलवर कालच्या बिनबाद १५ धावसंख्येवरुन आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. फलंदाजांनी कूर्मगती फलंदाजी केली. एकवेळ ९ षटकांत केवळ ३ धावांची भर घातली.पहिल्या सत्रात ३० षटकांत केवळ ६४ धावा फटकावल्या गेल्या. उपाहारानंतर गॅब्रियलने सिबलेला (५०) माघारी परतवत विंडीजला दुसरे यश मिळवून दिले. (वृत्तसंस्था)स्टोक्स बनला दुसरा सर्वात वेगवान आॅलराऊंडरसाऊथम्पटन : इंग्लंडचा हंगामी कर्णधार बेन स्टोक्स हा ४ हजार धावा तसेच १५० बळी घेणारा जगातील दुसरा सर्वात वेगवान आॅलराऊंडर बनला. विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत तिसºया दिवशी त्याने ही कामगिरी केली. स्टोक्सपूर्वी वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स, द. आफ्रिकेचा जॅक कालिस, भारताकडून कपिल देव आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेट्टोरी यांंनी अशी कामगिरी केली आहे. सोबर्स यांनी ही कामगिरी ६३ तर स्टोक्सने ६४ सामन्यात केली.संक्षिप्त धावफलकइंग्लंड (पहिला डाव) : ६७.३ षटकात सर्वबाद २०४ धावा.. वेस्ट इंडिज (पहिला डाव) १०२ षटकांत सर्व बाद ३१८. इंग्लंड दुसरा डाव ७० षटकात ३ बाद १६८ (सिबले ५०,बर्न्स ४२, जो डेनली२९) गोलंदाजी : चेस (२-४५), गॅब्रियल (१-३४)

टॅग्स :इंग्लंड