नवी दिल्ली : एखादा संघ आपला शंभरावा सामना खेळत असेल आणि तोच सामना एखाद्या खेळाडूचा शतक पूर्ण करणारा असेल तर, हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कारण एका संघाचा आणि खेळाडूचा एकच सामना शंभरावा कसा असू शकतो, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण असे आज घडले आहे आणि तेदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. संघाच्या पहिल्या ते शंभराव्या सामन्यापर्यंत एक खेळाडू संघात राहणे, हीदेखील मोठी गोष्ट आहे.
आतापर्यंत एका देशाचा शंभरावा सामना असेल आणि खेळाडूचीही ती शतकी लढत असावी, असे पहिल्यांदा घडत आहे. कारण यापूर्वी एकाही खेळाडूला अशी गोष्ट करणे जमलेले नाही. ही गोष्ट घडली आहे ती अफगाणिस्ताच्या संघाबरोबर आणि तो खेळाडू ठरला आहे मोहम्मद नबी.
यापूर्वी स्टिव्हन टिकोलोच्या नावावर 49 सामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचे पहिले कर्णधार केप्लर वेसल्स यांच्या नावावर 42 सामने आहेत.