आरूष पाटणकर आणि पुरंजय सावंतची खणखणीत शतके

संतोषकुमार घोष ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 08:17 PM2018-11-16T20:17:06+5:302018-11-16T20:18:30+5:30

whatsapp join usJoin us
centuries by Aarusha Patankar and Puranjeet Sawant | आरूष पाटणकर आणि पुरंजय सावंतची खणखणीत शतके

आरूष पाटणकर आणि पुरंजय सावंतची खणखणीत शतके

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देशिवाजी पार्पवर सुरू असलेल्या स्पर्धेचा आजचा दिवस गाजवला तो सिंघानिया क्रिकेट अकादमीच्या आरूष पाटणकर आणि पुरंजय सावंत या सलामीवीरांनी. दोघांनीही जेबीसीएन बोरीवली संघाच्या गोलंदाजीला अक्षरशा फोडून काढत बिनबाद 223 धावांचा पाऊस पाडला.आरूषने 61 चेंडूंत 103 धावा ठोकल्या तर पुरंजयने 62 चेंडूंत 107 धावा चोपून काढल्या.

मुंबई : आरूष पाटणकरच्या घणाघाती 103 आणि पुरंजय सावंत तडाखेबंद 107 धावांच्या खेळीमुळे बिनबाद 223 धावांचा डोंगर उभारणाऱया सिंघानिया क्रिकेट अकादमीने दुबळ्या जेबीसीएन बोरीवली संघाचा डाव अवघ्या 54 धावांत गुंडाळून काऊंटी क्रिकेट क्लब आयोजित 12 वर्षाखालील मुलांच्या संतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत 180 धावांनी प्रचंड विजय मिळविला. तसेच आज झालेल्या पहिल्या फेरीच्या अन्य सामन्यात भोसले क्रिकेट अकादमी, केआरपी इलेव्हन आणि साळगावकर क्रिकेट अकादमीने विजयी सलामी दिला.

शिवाजी पार्पवर सुरू असलेल्या स्पर्धेचा आजचा दिवस गाजवला तो सिंघानिया क्रिकेट अकादमीच्या आरूष पाटणकर आणि पुरंजय सावंत या सलामीवीरांनी. दोघांनीही जेबीसीएन बोरीवली संघाच्या गोलंदाजीला अक्षरशा फोडून काढत बिनबाद 223 धावांचा पाऊस पाडला. दोघांनीही आपली वैयक्तिक शतकेही पूर्ण केली. आरूषने 61 चेंडूंत 103 धावा ठोकल्dया तर पुरंजयने 62 चेंडूंत 107 धावा चोपून काढल्या. त्यानंतर आरूषने अष्टपैलू चमक दाखवत 9 धावांत 3 बळी टिपले तर ध्रुव गाला आणि खुश पाठक यांनीही प्रत्येकी तीन-तीन बळी मिळवित जेबीसीएनचा डाव 54 धावांतच गुंडाळला.

 

संक्षिप्त धावफलक

सिंघानिया क्रिकेट अकादमी- 20 षटकांत बिनबाद 223 ( आरूष पाटणकर नाबाद 103, पुरंजय सावंत नाबाद 107) वि. वि. जेबीसीएन बोरीवली - 17 षटकांत सर्वबाद 54 ( आरूष पाटणकर 9 धावांत 3 बळी,ध्रूव गाला 10 धावांत 3 बळी)

मुंबई स्पोर्टिंग इलेव्हन ठाणे - 16.3 षटकांत सर्वबाद 48 (निशांत भुवड 22, हरप्रित सिंग 24; युवराज यादव 12 धावांत 3 बळी, सौरीष देशपांडे 5 धावांत 3 बळी) पराभूत वि. भोसले क्रिकेट अकादमी - 7षटकांत 1 बाद 49 ( अंतरिक्ष गुप्ता ना. 24, सागर गुप्ता ना. 22)

शिवसेवा क्रिकेट अकादमी- 20 षटकांत सर्वबाद 54 ( सार्थक भिडे ना. 27, तनीष दुधवडकर 20 ; अंकित यादव 9 धावांत 3 बळी, आफताब आलम 6 धावांत 3 बळी, शरथ बालीभट्ट 6 धावांत 3 बळी) पराभूत वि. केआरपी इलेव्हन - 7 षटकांत बिनबाद 55 ( प्रणव सावंत ना. 23, आर्यन पेडणेकर ना. 25)

श्रीमा गुरूकुल - 19.5 षटकांत सर्वबाद 47 (प्रज्वल मंडलिक 31, कमलेश जाधव 12, जोशवा कोठारी 12धावांत 3 बळी) पराभूत वि. साळगावकर क्रिकेट अकादमी 8 षटकांत 3 बाद 48 (शुभम मोटवे 21,ओमकार लोखंडे 18)

Web Title: centuries by Aarusha Patankar and Puranjeet Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई