नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्या नावाचा चांगलाच बोलबाला आहे. त्याच्या गोलंदाजीवर खेळणे भल्याभल्या फलंदाजांना जमत नाही. आयपीएलमध्ये सुरूवातीला मुंबई इंडियन्स आणि आता रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाकडून खेळणा-या चहलचे नाव आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये घेतले जात आहे. चहल आणि कुलदीप यादव ही जोडी इंग्लंडच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 12 जुलैपासून सुरू होणा-या वन डे मालिकेत या जोडगोळीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. इंग्लंड दौ-यावर असलेल्या या खेळाडूंनी नुकत्याच वॉट द डक या कार्यक्रमाला भेट दिली. त्यात या दोन्ही खेळाडूंनी अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या. यात ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू अँड्य्रु सायमंडमुळे आपल्याला टॉवेलवर हॉटेल सोडावे लागल्याचा किस्सा सांगितला. सायमंड आणि चहल यांची जुनी मैत्री आहे. 2011च्या आयपीएल स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यावेळी सायमंडमुळे ड्रेसिंग रुमपासून ते हॉटेल रूमपर्यंत टॉवेलवरच जावे लागल्याचा किस्सा चहलने सांगितला. सामन्यानंतर प्रत्येक खेळाडू आईस बाथ घेत असे, परंतु चहल त्यापासून पळ काढत असे. एकदिवस सायमंडने संघातील काही खेळाडूंसह मिळून चहलला आईस बाथ घालण्याचा प्लान आखला. सायमंडने जवळपास दोन-तीन मिनिटे चहलला आईस बाथ करायला लावली आणि त्यानंतर चहल टॉवेलवरच हॉटेलमध्ये पळाला. त्याने आपल्या सोबत अतिरिक्त कपडे आणले नव्हते आणि त्यामुळे त्याला टॉवेलवरच आपल्या खोलीपर्यंत जावे लागले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सायमंड्सने केला घोळ; टॉवल गुंडाळून रूमवर जाताना चहलची 'हालत खराब'
सायमंड्सने केला घोळ; टॉवल गुंडाळून रूमवर जाताना चहलची 'हालत खराब'
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू अँड्य्रु सायमंडमुळे आपल्याला टॉवेलवर हॉटेल सोडावे लागल्याचा किस्सा युझवेंद्र चहलने सांगितला.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:16 PM