नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवली जात आहे. खरं तर स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्याने टीम इंडियाचे सामने श्रीलंकेत होत आहे. पण, श्रीलंकेत सातत्याने होत असलेल्या पावसामुळे मोठा ट्विस्ट आल्याचे दिसते. आशिया चषकाचे सर्व सामने पाकिस्तानात व्हावेत अशी शिफारस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय सचिव आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांच्याकडे केली आहे.
पीसीबीच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी श्रीलंकेतील प्रतिकूल हवामानाच्या चिंतेमुळे आशिया चषकाचे सामने पाकिस्तानमध्ये हलवण्याची शक्यता वर्तवली आहे. अश्रफ यांनी जय शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव मांडला.
दरम्यान, श्रीलंकेत होत असलेला पाऊस सामन्यात व्यत्यय आणत आहे. शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. भारत-पाकिस्तान सुपर-४ मध्ये पुन्हा भिडण्याची शक्यता असून हा सामना दुबईत खेळवला जाण्याची शक्यता आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन)
आशिया चषकासाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उस्मान मीर, फहीम अशरफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सौद शकील, शाहीन आफ्रिदी. (राखीव - तैय्यब ताहिर)
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: Chairman of the Management Committee of the Pakistan Cricket Board zaka Ashraf contacts Shah, recommends shifting Asia Cup 2023 matches to Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.