विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीची कथा फारशी वेगळी नाही. मागच्या वर्षी हा संघ अंतिम अर्थात आठव्या स्थानी राहिला. संघाच्या खात्यात तीन विजयांसह यंदा केवळ सहा गुण आहेत.फरक इतकाच की त्यांनी दिल्लीच्या तुलनेत एक सामना कमी खेळला. आरसीबीच्या जमेची बाब अशी की १७ एप्रिल २०१६ पासून त्यांनी दिल्लीला एकही सामना गमविलेला नाही.नवी दिल्ली : कोच बदलले, कर्णधारही बदलला, इतकेच नव्हे संपूर्ण संघात आमूलाग्र बदल केले तरीही दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नशीब फळफळण्याची चिन्हे नाहीत. सलग सहाव्या वर्षी ‘प्ले आॅफ’मधून बाहेर झालेल्या या संघाला आयपीएलमध्ये आज शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे आव्हान असेल. अंतिम स्थानावर राहण्याची नामुष्की टाळण्यासाठी आरसीबीला पराभूत करावेच लागणार आहे.डेअरडेव्हिल्स गेली पाच वर्षे प्ले आॅफपासून वंचित आहे. यंदा रिकी पाँटिंग या संघाचा कोच बनला. केकेआरला दोनदा जेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरकडे नेतृत्व सोपविले. नव्या लिलावात संपूर्ण संघ बदलला. पण निकाल मात्र शून्यच. तरीही सहाव्या वर्षी संघाची घसरण सुरूच आहे.फलंदाजी आणि गोलंदाजीत हा संघ ढेपाळला. क्षेत्ररक्षणातही अक्षम्य चुका केल्या. ११ सामन्यात केवळ तीन विजयांसह हा संघ स्पर्धा संपायला वेळ असताना बाहेर पडला आहे.डेअरडेव्हिल्स अखेरचे काही सामने घरच्या मैदानावर खेळत असला तरी त्यांनी फिरोजशाहवर याआधी हैदराबादविरुद्धचा सामना गमावला आहे. रिषभ पंतच्या नाबाद १२८ धावा संघाचा विजय साकार करू शकला नाही. गेल्या काही सामन्यात दिल्लीची फलंदाजी पंतच्या सभोवताल फिरत आहे. त्याने ११ सामन्यात ५२१ धावा ठोकल्या. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने ३५४ आणि युवा पृथ्वी शाह याने सहा सामन्यात २१४ धावा केल्या.आरसीबीसाठी कोहलीने ३९६ अशा सर्वाधिक धावा केल्या असून डिव्हिलियर्सने २८६, मनदीपसिंग २३२ व डिकॉकने २०१ धावांचे योगदान दिले. कोहलीचे हे होमग्राऊंड आहे. भारतीय कर्णधार चाहत्यांना निराश करणार नाही, अशी दिल्लीकरांना आशा आहे.आरसीबी देखील गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात ढेपाळला आहे. एकीकडे ट्रेंट बोल्टला सहकाºयांचा पाठिंबा लाभला नाही तर आरसीबीच्या सहकाºयांनी उमेश यादवला साथ दिलेली नाही.एकूणच जो संघ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सरस ठरेल त्या संघाच्या विजयाची शक्यता अधिक असेल. कोटलाच्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या सहज नोंदविता येत नाही. अशावेळी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील गलथानपणा अंगलट येऊ शकतो.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आरसीबीविरुद्ध पराभवाची मालिका संपविण्याचे दिल्लीपुढे आव्हान
आरसीबीविरुद्ध पराभवाची मालिका संपविण्याचे दिल्लीपुढे आव्हान
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीची कथा फारशी वेगळी नाही. मागच्या वर्षी हा संघ अंतिम अर्थात आठव्या स्थानी राहिला. संघाच्या खात्यात तीन विजयांसह यंदा केवळ सहा गुण आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 6:58 AM