बडोदा : मालिका आधीच गमाविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला आज रविवारी तिस-या आणि अखेरच्या वन-डेत प्रतिष्ठा वाचविण्यासाठी आॅस्ट्रेलियाविरुद्ध संघर्ष करावा लागणार आहे. ‘क्लीन स्वीप’तर होणार नाही ना, याची काळजी घेत विजयासाठी खेळावे लागेल. ही आयसीसी वन-डे चॅम्पियनशिप मालिका आहे.
आॅस्ट्रेलियाने दोन्ही सराव सामने जिंकल्यानंतर दोन्ही वन-डेत सहज विजय नोंदविले. पहिला सामना त्यांनी आठ गडी राखून आणि दुसरा ६० धावांनी जिंकून मालिका हस्तगत केली. त्यामुळे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आॅस्ट्रेलियाला धूळ चारणाºया भारतीय संघाला पुन्हा एकदा विजयासाठी वर्चस्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. अनुभवी झूलन गोस्वामीच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी कमुकवत वाटत आहे. शिखा पांडे, पूजा वस्त्रकार यांचा वेगवान, तसेच पूनम यादव आणि एकता बिष्ट यांचा फिरकी मारा कुचकामी ठरला. दुसरीकडे भारतीय फलंदाजांना आॅस्ट्रेलियाचा फिरकी मारा खेळणे कठीण जात आहे.
कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि दीप्ती शर्मा अद्यापही ठसा उमटविण्यात अपयशी ठरल्या आहेत. पराभव टाळायचा झाल्यास या फलंदाजांना धावा काढाव्याच लागतील. आॅस्ट्रेलियाने प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजविले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात यजमान खेळाडू यशस्वी ठरलेच शिवाय सलामीच्या फलंदाजांनी धडक सुरुवात करून दिली हे विशेष. (वृत्तसंस्था)
भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, जेमिमा रोड्रिग्स, सुषमा वर्मा, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, मोना मेश्राम, पूनम यादव, सुकन्या पंिरदा.
आॅस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), एलिसा हिली, निकोल बोल्टन, निकोला केरी, एलीसे पेरी, एली वेल वेलनी, एशले गार्डनर, राचेल हेन्स, जेस जोनासन, सोफी मोलाइनिन, मेगन शट, बे मूनी, बेलिंडा वाकारेवा, अमान्डा जेड वेलिंग्टन
Web Title: Challenge to honor the Indian women, the third one-day match against Australia today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.