मुंबई : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये यंदाचा रणजी मोसम खेळत असलेले गतउपविजेते मुंबईकर मंगळवारपासून घरच्या मैदानावर बलाढ्य तामिळनाडूविरुद्ध दोन हात करतील. सलामीला मध्य प्रदेशविरुद्ध अनिर्णीत सामना खेळल्यानंतर मुंबईला आपल्या दुसºया सामन्यात तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.वांद्रे येथील एमसीए शरद पवार क्रिकेट अकादमी येथे होणाºया या सामन्यात मुंबईपुढे सर्वोत्तम खेळ करण्याचे आव्हान असेल. ‘क’ गटात समावेश असलेल्या मुंबईकरांनी मध्य प्रदेशविरुद्धच्या अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेत महत्त्वपूर्ण तीन गुणांची कमाई केली. त्याचवेळी, तामिळनाडूपुढेही कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल. त्यांनी आतापर्यंत दोन सामने खेळले असून त्यांच्या खात्यात केवळ ४ गुण आहेत. आपल्या दोन्ही सामन्यांत तामिळनाडूला तुलनेत कमजोर असलेल्या आंध्रे प्रदेश आणि त्रिपूराविरुद्ध झुंजावे लागले होते.दरम्यान, पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणामुळे खेळू न शकलेला कर्णधार आदित्य तरे तामिळनाडूविरुद्ध पुनरागमन करणार आहे. तसेच, भारतीय टी२० संघात स्थान मिळवणार श्रेयस अय्यरही या सामन्यात खेळणार असल्यानेमुंबईच्या फलंदाजीला बळकटी आली आहे.त्याचबरोबर गतमोसमात रणजी पदार्पण करताना शतक झळकावलेला पृथ्वी शॉ आणि अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांचे संघात पुनरागमन झाल्याने तामिळनाडूपुढे कठीण आव्हान असेल.भारत ‘अ’ आणि अध्यक्षीय एकादश संघात खेळत असल्याने श्रेयस, पृथ्वी आणि धवल पहिल्या सामन्यासाठी मुंबई संघातून खेळले नव्हते. मात्र, या तिघांच्या पुनरागमनानंतर मुंबईची ताकद वाढली आहे. त्याचवेळी, तामिळनाडूची मुख्य मदार अष्टपैलू रविचंद्रन आश्विन आणि हुकमी सलामीवीर फलंदाज मुरली विजय यांच्यावर असेल.यातून निवडणार संघ :मुंबई : आदित्य तरे (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), जय बिस्त, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, आदित्य धुमाळ, रॉयस्टन डायस, विजय गोहिल, अखिल हेरवाडकर, एकनाथ केरकर, सिद्धेश लाड, शिवम् मल्होत्रा, मिनाद मांजरेकर, अभिषेक नायर, आकाश पारकर, शुभम रांजणे, धवल कुलकर्णी आणि सुफियान शेख.तामिळनाडू : अभिनव मुकुंद (कर्णधार), बाबा इंद्रजीत (उपकर्णधार), बाबा अपराजीत, रविचंद्रन आश्विन, कौशिक गांधी, नारायण जगदीसन, वेलिदी लक्ष्मण, मालोलन रंगराजन, रवीकुमार रोहिथ, रविश्रीनिवासन साई किशोर, राहिल शाह, क्रिष्णमूर्ती विग्नेश, लक्ष्मीनारायण विग्नेश, मुरली विजय आणि वॉशिंग्टन सुंदर.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मुंबईपुढे बलाढ्य तामिळनाडूचे आव्हान, कर्णधार तरे, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन
मुंबईपुढे बलाढ्य तामिळनाडूचे आव्हान, कर्णधार तरे, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन
मुंबई : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये यंदाचा रणजी मोसम खेळत असलेले गतउपविजेते मुंबईकर मंगळवारपासून घरच्या मैदानावर बलाढ्य तामिळनाडूविरुद्ध दोन हात करतील.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 2:48 AM