भारताला ऑस्ट्रेलियाकडून नुकताच दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे कर्णधार, खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यावर केवळ टीकाच झाली नाही, तर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रडारवरही आले आहेत. यानंतर, आता बीसीसीआय भारतीय क्रिकेटर्ससाठी कडक नियम बनवण्याचा विचार करत आहे. यानुसार, खेळाडूंच्या पत्नी संपूर्ण दौऱ्यावर त्यांच्यासोबत जाऊ शकणार नाहीत. त्यांना आपल्या पतीसोबत राहण्यासाठी केवळ काही दिवसच मिळतील, असे वृत्त आहे.
शनिवार को हुई मीटिंग -टीम इंडियाच्या पराभवानंतर बीसीसीआयने एक बैठक आयोजित केली होती. शनिवारी मुंबईत झालेल्या या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हेदेखील उपस्थित होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, बोर्ड खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे बनवत आहे. यात क्रिकेटर्सच्या फॅमिलीसंदर्भआतही एक नियम असणार आहे. यानुसार, क्रिकेटर्सच्या पत्नी संपूर्ण ४५ दिवसांच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत राहू शकणार नाही.
किती दिवस सोबत राहता येणार? - माध्यमांतील वृत्तांनुसार, खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त दोन आठवडे राहण्याची परवानगी असेल. पुन्हा एकदा २०१९ पूर्वी असलेले नियम लागू होतील. संपूर्ण परदेश दौऱ्यांदरम्यान खेळाडूंचे कुटुंब सोबत असल्याने, खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो, यासंदर्भात विचार करण्यात आला. यामुळे, खेळाडूंच्या कुटुंबियांना परदेश दौऱ्यादरम्यान केवळ १४ दिवसांसाठी त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी असेल.