...अन् बीसीसीआयनं गंभीरच्या PA ला केलं 'आउट'; टीम इंडियाच्या हॉटेलातच ठोकायचा मुक्काम

बीसीसीआय नियमावलीच्या बाबतीत कुणालाही सूट देण्याच्या मूडमध्ये नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:35 IST2025-02-14T11:25:31+5:302025-02-14T11:35:30+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 BCCI New Rules Strict On Indian Head Coach Gautam Gambhir’s PA Denied Access To Team India’s Facilities | ...अन् बीसीसीआयनं गंभीरच्या PA ला केलं 'आउट'; टीम इंडियाच्या हॉटेलातच ठोकायचा मुक्काम

...अन् बीसीसीआयनं गंभीरच्या PA ला केलं 'आउट'; टीम इंडियाच्या हॉटेलातच ठोकायचा मुक्काम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)  ऑस्ट्रेल‍िया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेनंतर खेळाडू आणि स्टाफ सदस्यांसाठी १० सूत्रीय नियमावली तयारी केली होती. घरच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत या नियमाच पालन झालं. आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान परदेशातही तोच पॅटर्न कायम दिसणार आहे. बीसीसीआय नियमावलीच्या बाबतीत कुणालाही सूट देण्याच्या मूडमध्ये नाही. त्यामुळेच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या पर्सनल असिस्टंटलाही (PA) संघासोबत राहता येणार नाही.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सर्वांना एकच नियम; बीसीसीआच्या नियमावलीमुळे गंभीर पडला एकटा

पीटीआयच्या वृत्तातून करण्यात आलेल्या दाव्यानुसार,  कोचिंग स्टाफमधील एका सदस्याचा वैयक्तिक सहाय्यक (PA), जो नियमित टीमच्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून असायचा तो आता टीमसोबत नसणार आहे. स्टाफ सदस्य तसेच खेळाडूंपासून त्याला दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. या वृत्तामध्ये थेट गौतम गंभीरच्या नावाचा उल्लेख केलेले नाही. पण भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरशिवाय अन्य स्टाफ सदस्यांपैकी कुणाकडेही पर्सनल असिस्टंट नाही. त्यामुळे गंभीरच्या सहाय्यकावरही आता निर्बंध आले आहेत.  

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली होती नाराजी

कोचिंग स्टाफसोबत बाहेरच्या व्यक्तीची उपस्थिती बीसीसीआयला खटकली होती. पीटीआयच्या वृत्तानुसार एका बीसीसीआय अधिकाऱ्याने यासंदर्भात प्रश्नचिन्हही उपस्थितीत केले होते. निवडकर्त्यांच्या बैठकीत तिसऱ्या व्यक्तीला परवानगी कशी मिळाली? s  अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटलंय की, अ‍ॅडिलेडच्या मैदानात बीसीसीआयशी संलग्नित असलेल्या व्यक्तीच्या सुविधा त्या व्यक्तीला का पुरवण्यात आल्या? असे प्रश्न या अधिकाऱ्याने उपस्थितीत केले होते. नाराज अधिकाऱ्याने संबंधित वैयक्तिक सहाय्यक (PA) फक्त टीम इंडिसाठी असलेल्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नाश्ता करताना दिसला होता. ही गोष्टही बोलून दाखवली होती.  

 
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपासून बदलले चित्र

 
इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेतून बीसीसीआयच्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. गंभीरचा वैयक्तिक सहाय्यक ज्याचं नाव गौरवर अरोरा असं आहे. तो सामन्याच्या ठिकाणी उपस्थितीत असल्याचे दिसून आले. पण खेळाडू आणि स्टाफ सदस्य तसेच बक्षीस सोहळ्याच्या कार्यक्रमापासून तो दूर राहिल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडियाच्या हॉटेल सोडून तो दुसरीकडे वास्तव्यास असल्याचा सीनही दिसून आला. 

दुबई दौरा फॅमिलीशिवायच, कारण... 

एखाद्या दौऱ्यादरम्यान कुटुंबीयांना सोबत न नेण्याची 'बीसीसीआय'ची नवी नीती आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपासून लागू होत आहे. यानुसार या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबीय दुबईला जाणार नाही. या स्पर्धेत भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. भारतीय संघ २० फेब्रुवारीला आपला पहिला सामना खेळणार असून, अंतिम सामना ९ मार्चला होईल. त्यामुळे हा दौरा तीन आठवड्यांहून कमी कालावधीचा होणार असल्याने बीसीसीआय खेळाडूंना कुटुंबीयांना सोबत नेण्याची परवानगी देणार नाही.

Web Title: Champions Trophy 2025 BCCI New Rules Strict On Indian Head Coach Gautam Gambhir’s PA Denied Access To Team India’s Facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.