दुबईच्या मैदानात रंगलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये पुन्हा एकदा विराट कोहलीनं आपल्या भात्यातील दमदार खेळीचा नजराणा पेश केलाय. आयसीसीच्या स्पर्धेत सर्वाधिक फिफ्टी प्लसचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड त्याने मागे टाकला आहे. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अर्धशतकासह किंग कोहलीनं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत शिखर धवनचा विक्रमही मागे टाकलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिनसह शिखर धवनला टाकले मागे
याआधी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक ७०१ धावांचा रेकॉर्ड हा शिखर धवनच्या नावे होता. आता भारताचा किंग या यादीत टॉपला पोहचला. दुसरीकडे आयसीसीच्या वनडे स्पर्धेत सर्वाधिक वेळा २४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम त्याने मोडीत काढला. सचिनने ५८ डावात २३ वेळा ही कामगिरी केली होती. विराट कोहलीनं ५३ डावात २४ व्या वेळी फिफ्टी प्लस धावा करत नवा रेकॉर्ड सेट केलाय. आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक फिफ्टी प्लस धावा करणारे फलंदाज
- विराट कोहली - ५३ डावात २४ वेळा फिफ्टी प्लस धावा
- सचिन तेंडुलकर - ५८ डावात २३ वेळा फिफ्टी प्लस धावा
- रोहित शर्मा - ४१ डावात १८ वेळा फिफ्टी प्लस धावा
- कुमार संगकारा - ५६ डावात १७ वेळा फिफ्टी प्लस धावा
- रिकी पाँटिंग - ६० डावात १६ वेळा फिफ्टी प्लस धावा