भारतीय क्रिकेट संघात बॅटिंग बॉलिंगसह फिल्डिंगमध्ये सर्वोच्च दर्जा दाखवणाऱ्या खेळाडूंची कमी नाही. विराट कोहली, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंसमोर चोरटी धाव घेणं म्हणजे मोठी रिस्कच आहे. त्याच रिस्क झोनपैकी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणारा अॅलेक्स कॅरी फसला. श्रेयस अय्यरनं फिल्डिंगचा सर्वोत्तम नजराणा पेश करत रॉकेट थ्रोवर कॅरीच्या खेळीला ब्रेक लावला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अय्यरच्या रॉकेट थ्रोसह संपली कॅरीची अर्धशतकी इनिंग
अखेरच्या षटकात अॅलेक्स कॅरीची फटकेबाजीला कोण वेसण घालणार असा प्रश्न निर्माण झाला असताना अय्यरनं ही भारतीय संघाला ही महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सेमी फायनल लढतीती श्रेयस अय्यरनं दाखवून दिलेल्या फिल्डिंगची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ४८ व्या षटकात श्रेय अय्यरनं जबरदस्त थ्रोसह कॅरीला तंबूचा रस्ता दाखवला. या षटकातील हार्दिक पांड्याच्या पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या नादात ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटर फसला. या विकेटमुळे अय्यरनं किमान १५-२० धावा वाचवल्या.
टार्गेट कमी करणारी फिल्डिंग, रन आउटसह अय्यरनं एक कॅचही टिपला
आघाडीचे फलंदाज स्वस्तात आटोपल्यावर अॅलेक्स कॅरीनं भारतीय फिरकीचा उत्तम सामना करताना दिसला. त्याने स्मिथसोबत अर्धशतकी भागीदारी रचत भारतीय संघातील गोलंदाजांचे अक्षरश: खांदे पाडले होते. कॅरीनं सेमी फायनलमधील महत्त्वपूर्ण लढतीत ५७ चेंडूचा सामना करताना ८ खणखणीत चौकारांसह एका षटकाराच्या मदतीने ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यरनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला नसता तर त्याने आपल्या आणि संघाच्या खात्यात आणखी काही धावांची भर घातली असती, असे त्याची बॅटिंग बघताना वाटत होते. कॅरीच्या रन आउटशिवाय अय्यरनं बेन ड्वॉरशुइसचा एक अप्रतिम कॅचही घेतला.