Umpires List for IND vs PAK, Champions Trophy 2025 : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात नकार दिला. त्यानंतर भारतीय पंच नितीन मेनन आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनीही पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. त्यामुळे ICC ने या स्पर्धेसाठी घोषित केलेल्या पंच व सामनाधिकाऱ्यांच्या गटात भारतीयांचा समावेश केला नाही. त्यामुळे आता भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) या हायव्होल्टेज सामन्यात पंच म्हणून कोण असेल, याची साऱ्यांनीच उत्सुकता होती. त्याबाबत आज आयसीसीने निर्णय दिला.
कुणावर असेल मोठी जबाबदारी?
स्पर्धेची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून कराची येथे सुरू होईल. अंतिम सामना ९ मार्च रोजी खेळवला जाईल. टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. या काळात २३ फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरूद्ध सामना खेळला जाणार आहे. याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी पॉल रॅफेल आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांची मैदानी पंच म्हणून नियुक्ती केली आहे. तर, मायकेल गॉफ हे टीव्ही पंच असतील. दुसरीकडे, एड्रियन होल्डस्टॉक हे चौथे पंच असतील आणि डेव्हिड बून मॅच रेफरीची भूमिका बजावतील.
इतर सामन्यांसाठी कुणावर जबाबदारी?
२० फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणाऱ्या भारत-बांगलादेश सामन्यासाठी पॉल रॅफेल आणि एड्रियन होल्डस्टॉक हे मैदानावरील पंच असतील. रिचर्ड इलिंगवर्थ हे टीव्ही पंच असतील. मायकेल गॉफ हे चौथे पंच असतील आणि बून हे सामनाधिकारी असतील. तर २ मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी मायकल गॉफ आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानी पंच असतील. होल्डस्टॉक टीव्ही पंच तर रॅफेल चौथे पंच आणि बून मॅच रेफरी असतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. यात पाकिस्तानने ३ सामने जिंकले आहेत आणि टीम इंडियाने २ सामने जिंकले आहेत. २०१७ मध्ये स्पर्धेचा अंतिम सामना या दोन संघांमध्ये खेळला गेला होता. त्यावेळी पाकिस्तानने भारतीय संघाला हरवून जेतेपद पटकावले होते.
Web Title: Champions Trophy 2025 IND vs PAK ICC names Umpires match officials for india vs pakistan match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.